नाशिक जिल्हा प्रतिनिधी : शरद राव लोहकरे

नाशिकच्या येवला शहरात मकर संक्रांतीचा सण जवळ येऊन ठेपलेला असतांना अजून ही शहरात नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत आहे.

 

पोलिसांनी कितीही छापे मारले तरी नायलॉन मांजाचा वापर होत आहे.नायलॉन मांज्या मुळे अनेक जण काही दिवसांपुर्वी जखमी झालेले असतांना आज कोटमगाव रोड बायपास वरुन दुचाकी गाडीवर जणारे रितेष मुथा यांच्या गळाला नायलॉन मांज्या लागल्याने त्यांचा गळा चिरला गेला मात्र त्यांना वेळीच अनिरुध्द हॉस्पिटल या खाजगी दवाखान्यात नेण्यात येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

डॉक्टर तुषार सोलंके यांनी त्यांच्यावर उपचार केले असून आता त्यांची प्रकृती ठिक असल्याच डॉक्टरांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय