इंदापूर प्रतिनिधी: गोविंद पाडुळे

छत्रपतीशिवाजी महाराज जयंतीनिमित्त नरूटवाडी, तालुका इंदापूर येथे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी महाराणा प्रताप कबड्डी संघ कळंब यांना प्रथम क्रमांक मिळाला.तसेच ईगल डोरलेवाडी, इंदापूर व्यायाम मंडळ व यंगस्टार शिरसुफळ या संघांना अनुक्रमे द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळाला.

मा.सिकंदर देशमुख, मा.शरद झोळ, मा.भरत भुजबळ, मा. बाप्पू घोगरे व मा. इरफान मोमीन यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.राहुल देवकर (उपसरपंच), अक्षय कोकाटे (युवक उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) युवा नेते समाधान कोकाटे, उद्योजक बापू बोराटे व योगेश मोरे यांच्या सहकार्याने सदर स्पर्धा पार पडल्या.

सदर स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस कृष्णा दिवसे, विशाल दिवसे,अक्षय मारकड, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पै.गणेश व्यवहारे,अक्षय शिंदे, तृतीय क्रमांकाचे बक्षीस पै.आण्णासो चोरमले, दत्तात्रय शिंगाडे व चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस पै.नाना करे यांनी दिले. शंकर चोरमले नारायण हावलदार व अक्षय मेंगडे यांनी विशेष बक्षिस दिले. शहीद पै. कुंडलिक कोकाटे यांचे स्मरणार्थ नवनाथ कोकाटे यांच्याकडून चषक सौजन्य मिळाले.

इंदापूर व्यायाम मंडळ यांच्याकडून सदर स्पर्धेसाठी आयोजन करण्यात आले होते. इंदापूर व्यायाम मंडळ व नरूटवाडी येथील तरुणांनी सदर स्पर्धा पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय