आपण त्वचेची ज्याप्रमाणे काळजी घेतो त्याप्रमाणे नखांची देखील घेतो. यासाठी आपण मॅनिक्युअर्स आणि पेडीक्योर करून हाता पायांचे सौंदर्य वाढवतो. पण, हीच नख तुमचे आरोग्य किती उत्तम आहे, हे दाखवतात.
जर तुमची नखे सुंदर आणि निरोगी असतील तर तुम्ही देखील निरोगी आहात. तुमच्या आरोग्याचे रहस्य तुमच्या नखांमध्ये दडलेले आहे. जर तुमच्या नखांचा रंग आणि पोत बदलत असेल तर त्याचा थेट संबंध तुमच्या बिघडलेल्या आरोग्याशी आहे. जर नखे खडबडीत, रंगीबेरंगी आणि त्वरीत तुटत असतील तर तुम्हाला केवळ लक्ष देण्याची गरज नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील आवश्यक आहे.
मऊ नखे – मऊ किंवा कमकुवत नखे म्हणजे आपली नखे सहजपणे तुटतात किंवा तुटण्यापूर्वी वाकतात. हे केमिकल किंवा आर्द्रतेच्या जास्त संपर्कामुळे होऊ शकत. आपले नखे बरे होण्यासाठी, त्यांना केमिकल पासून दूर ठेवा. कमकुवत नखे हे देखील व्हिटॅमिन बी , कॅल्शियम, आयरन किंवा फॅटी ऍसिडच्या कमतरतेचे लक्षण आहे.
नाजूक नखे -नखांच्या सर्वात सामान्य समस्यांपैकी एक म्हणजे खडबडीत आणि क्रॅक नखे. हे बहुतेक स्त्रियांमध्ये दिसून येते. नखे वारंवार ओले आणि कोरडे होण्याचे परिणाम म्हणून याला ऑन्कोशिझिया देखील म्हणतात. अशा नखांचे आणखी एक कारण हायपोथायरॉईडीझम किंवा आयरन ची कमतरता असू शकते. म्हणून, जर आपले नखे असा काही संकेत देत असतील, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
* पिवळे किंवा काळे नखे -पिवळे नखे हे अगदी सामान्य आहेत आणि ते सहसा संसर्गामुळे किंवा नेलपॉलिशसारख्या उत्पादनामुळे होतात. कधीकधी नखांवर काळ्या रेषा दिसू लागतात, या रेषा स्प्लिंटर्ससारख्या दिसू शकतात.
नखे आरोग्याबाबत देतात हे १० संकेत !
-> नखं पातळ झाली असतील तर तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण क्रिया बिघडली असल्याचं ते लक्षण आहे असं समजावं.
-> नखांवरील आडव्या रेषा या नखांचंच आरोग्य बिघडलं असल्याचे संकेत देतात.
-> जर नखं वाकडी-तिकडी झाली असतील तर तुमचं मानसिक असंतुलन बिघडू शकतं. तसंच त्वचारोग आणि अॅनिमायासुद्धा होऊ शकतो.
-> जर तुमच्या नखांवर बारीक शिरा दिसत असतील तर न्यूरोसिसचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-> नखांमध्ये जर वेदना होत असतील तर ती बुरशीच्या संसर्गाची ती लक्षणं असतात. बहुतांश लोकांमध्ये हा पायाच्या बोटांना होतो.
-> तुमच्या नखांवर निळसर रंगाचा डाग दिसल्यास ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. कारण हे डाग तुमच्या शरीराला याग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याचं दर्शवतात.
-> नखांच्या रंगात अचानक बदल झाल्यास ते काळजीचं कारणं असू शकतं. नखांना एक नैसर्गिक रंग असतो, त्याएवजी ती पांढरी दिसू लागली तर तुमच्या यकृतामध्ये समस्या निर्माण झाली असल्याचे ते संकेत असतात. हिपॅटायटीसचं हे प्राथमिक लक्षण असू शकतं.
-> जर तुमच्या नखांचा रंग पिवळसर दिसत असेल ते एखाद्या दीर्घकाळाच्या आरोग्य समस्येचं लक्षण असू शकतं.
-> ठिसूळ झालेली नखं सहजपणे तुटतात किंवा दुमडल्या जातात. ठिसूळ झालेली अशी नखं ही तुमच्या शरीरात लोहाचं प्रमाण कमी आहे कमतरता दर्शवितात. अॅनिमिया किंवा त्यासारखे आजार तुम्हाला होऊ शकतात.
नखांची काळजी कशी घ्यावी, काही सोप्या टिप्स
सर्व प्रथम, आपल्या आहाराकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही निरोगी असाल तेव्हा बाह्य सौंदर्य आपोआप वाढेल.
कोमट पाण्याने हात धुण्याचा प्रयत्न करा, नखांमध्ये घाण साचू देऊ नका.
पाण्याचे काम जास्त दिवस चालत असेल तर हातमोजे वापरावेत.
डिटर्जंट किंवा रसायनांपासून शक्य तितके नखांचे संरक्षण करा.
तुम्ही तुमच्या नखांचा मसाज करूनही त्यांना निरोगी ठेवू शकता. नारळ, ऑलिव्ह ऑइल किंवा एरंडेल तेलाने नियमित मसाज करा.
वेळोवेळी ट्रिम करत रहा आणि फक्त चांगला नेल पेंट वापरा. स्वस्त नेल पेंट किंवा नेलपॉलिश रिमूव्हर तुमच्या नखांना खराब करतात.
जर नखांमध्ये रंग खराब झाला असेल किंवा चांगला आहार घेऊन आणि सर्व खबरदारी घेऊनही बदल होत नसेल, तर तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्या होण्याची शक्यता आहे. तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि स्वतःची चाचणी करा.
Heart Attack reason : हार्ट अटॅक येण्याआधी शरीर देते १० संकेत, वेळीच सावध व्हा, नाहीतर…