monsoon 2023 marathi

monsoon 2023 marathi : शेतकरी मित्रांनो सध्या वातावरण हे वेगळ्या स्वरूपाचे आहे. उष्णता वाढली आहे येणारा मान्सून कसा असणार आहे ते आपण पाहूया.

नुकताच स्कायमेट वेदर या खासगी संस्थेचा हवामान अंदाज आला आहे. या खासगी हवामान संस्थेचा दावा भारत सरकारने फेटाळला आहे.

काल स्कायमेट हवामानाने असा दावा केला होता की , भारतात या यावर्षी मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, जो आज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने पूर्णपणे नाकारला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यावर्षी भारत देशात मान्सून कसा असणार आहे ? याबाबत भारतीय हवामान विभागाचा पहिला अंदाज आला आहे. हा अंदाज स्कायमेट या संस्थेच्या अंदाजाच्या विरुद्ध आहे.

हे पण वाचा ..10 लाखाचे कर्ज काढून रोपवाटीकेचा व्यवसाय सुरू केला; आता कमवतायत लाखो रुपये

 ‘स्कायमेट’चा monsoon 2023 marathi काय होता दावा?

स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने सोमवारी सांगितले होते की, यंदा कमकुवत मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. भारतात यावर्षी पावसाची शक्यता सामान्यपेक्षा कमी आहे. ‘एल निना’ संपल्याने दुष्काळ पडण्याची शक्यता 20 टक्के आहे. तसेच एल निनो देखील वर्चस्व गाजवू शकतो. कमी पावसामुळे यंदा पिकांवर संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेती करणे महागात पडू शकते.

सिंचन अनुदान योजना: शेतकऱ्याला २४ लाख रुपये अनुदान ! शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन, अर्ज कोठे करावा? आवश्यक कागदपत्रे

20 टक्के दुष्काळ पडण्याची होती भीती

‘स्कायमेट’च्या मते, यावर्षी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यांत 868.6 मिमी पावसाचा एलपीए 94 टक्के असेल.

स्कायमेटने म्हटले आहे की, देशाच्या उत्तर आणि मध्य भागात पावसाची कमतरता असेल. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही जुलै आणि ऑगस्टमध्ये कमी पाऊस पडेल.

उत्तर भारतात, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये वर्षाच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेटनेही २० टक्के दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवली होती.

मात्र भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्कायमेट चा दावा फेटाळत देशातील पावसाविषयी यंदा पहिला अंदाज वर्तविला आहे. पृथ्वी मंत्रालयाच्या अंदाजामुळे मात्र देशातील शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळण्याचे संकेत आहेत.

 

देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

monsoon 2023 marathi यावर्षी देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस (Rain) होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (Indian Meteorological Department) दिली आहे.

देशात यंदा सामान्य पाऊस राहणार आहे. आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे.

यंदा देशात 870 मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार आहे.

तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा हवामान विभागाचा दीर्घकालीन अंदाज आहे.

असेच ताज्या अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉइन व्हा!

हे पण वाचा ….

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय