maharashtra school uniform news: यंदा राज्यस्तरावर सरकारी शाळांमध्ये मोफत दिले जाणारे गणवेश खरेदी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमधील राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आणि सर्व मुलींना सरकार मोफत गणवेश, शूज आणि साहित्य पुरवते.
या वर्षीपासून खुल्या गटातील विद्यार्थ्यांनाही मोफत गणवेश दिला जाणार आहे. यामुळे राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये गणवेश असावा लागणार आहे. यासाठी केवळ दीड महिना उरला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
➡ शाळांचा गणवेश एकाच प्रकारचा असायला हवा-
कापड खरेदीसाठी निविदा काढणे, त्यानंतर मूळ गणवेशाची शिलाई करणे आणि राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचवणे ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या दीड महिन्यात पूर्ण करावी लागणार आहे.
मात्र, पालक व शिक्षकांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.
सध्या गणवेश काय असावा हे शाळा आणि ग्रामस्थ आपापल्या स्तरावर ठरवतात. अनेक शाळांमध्ये गणवेशाचा रंग विद्यार्थी स्वत: ठरवतात.
यासाठी मतदानासारखे उपक्रमही शाळा घेतात. आता राज्यस्तरावरून गणवेश खरेदी करायचा असेल तर राज्यातील सर्व सरकारी शाळांचा गणवेश एकाच प्रकारचा असायला हवा.
➡ खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला
राज्य सरकारने पुढाकार घेतला, आता शांळांना पैसे मोजावे लागणार नाहीत.
पूर्वी शासनाकडून पैसे वाटप होत असे आणि शाळा व्यवस्थापन समित्या, संस्था यांच्या स्तरावर कापड खरेदी करून विद्यार्थ्यांना गणवेश दिले जायचे.
काही वर्षांपूर्वी असाच खरेदीचा प्रयोग राज्यस्तरावर करण्यात आला होता.
मात्र, त्यावेळी गोंधळ उडाला आणि सरकारला टीकेला सामोरे जावे लागले.
आता हा नियम बदलून खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आले.
मात्र, काही अधिकाऱ्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.
त्यामुळे शासनाने आता राज्यस्तरावर गणवेश खरेदीबाबत पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे. maharashtra school uniform news
दहावी बारावीचा निकाल कोणत्या तारखेला लागणार
➡ सरकारकडे आता केवळ दीड महिन्याचा कालावधी
राज्यातील शाळांना सुट्टी आहे. मात्र, 15 जूनपासून राज्यातील सर्व वर्ग सुरू होणार आहेत. त्यापूर्वी शाळेचा गणवेश पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारकडे आता केवळ दीड महिन्याचा कालावधी उरला आहे. यावेळी शाळेचा ड्रेस तयार ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा पुन्हा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी मे महिन्यात शालेय गणवेशाची रक्कम जिल्हास्तरावर उपलब्ध होते. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शाळांमध्ये त्याचे वाटप केले जाते आणि शाळा व्यवस्थापन समिती कापड खरेदी, गणवेश शिवण्याची प्रक्रिया सुरू करते.
मात्र, हा निधी अद्याप शाळांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे राज्य सरकार गणवेशाचे वाटप करेल, असा अंदाज आहे.
राज्याच्या स्तरावर गणवेश खरेदी करायची झाल्यास कापड खरेदीची निविदा, त्यानंतर प्रत्यक्ष गणवेश शिवून घेणे ते राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचवणे अशी सर्व प्रक्रिया अवघ्या दीड महिन्यांत पूर्ण करावी लागणार आहे.
फक्त 2 मिनिटात तुमच्या फोनवरून आधार कार्डमधील मोबाईल नंबर बदला
मित्रांनो, ताज्या अपडेट, सरकारी योजना, देशातील चालू परिस्थिती, ट्रेंडिंग, कृषी, सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक माहितीसाठी
आमच्या http://www.abcmarathinews.com ह्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. किंवा व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉइन होऊ शकता.
एबीसी मराठी न्यूजच्या महत्त्वाच्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवण्यासाठी या समुदायात सामील व्हा.