माढा/प्रतिनिधी:- अजिनाथ कनिचे
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. दिलीप स्वामी साहेब जिल्हा परिषद सोलापूर यांच्या “माझे मुल माझी जबाबदारी” या उपक्रमा अंतर्गत जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तांदुळवाडी येथे विद्यार्थी आरोग्य तपासणी करण्यात आली.
राष्ट्रीय बाल कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मार्फत “माझे मुल माझी जबाबदारी” या अंतर्गत येणाऱ्या वय 0 ते 18 वर्ष वयोगटतील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये जन्मजात आजार, रक्ताचे प्रमाण, वजन, उंची तसेच कुपोषित बालके यानुसार तपासणी करून तात्काळ औषध उपचार देण्यात आले.
सर्व पालकांचा व बालकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. ज्या बालकांना गरज आहे त्यांना औषध उपचार करण्यात आले.
व शाळेकडून घरी अभ्यास करण्यासाठी पुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी रिधोरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय कर्मचारी डॉ. कांबळे एस. एस. यांनी विद्यार्थी व पालकांना माझे बालक माझी जबाबदारी व येणाऱ्या कोरोना तिसऱ्या लाटेसाठी काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी (देशमुख मॅडम), पांडुरंग कांबळे (सर), दत्तात्रय जाधव (सर), प्रतापसिंह कदम (सर), सुरेश खटाळ (सर), आशा जंगले (मॅडम), हनुमंत इंगळे (सर), किरण गवळी (उपसरपंच), अजिनाथ कनिचे (ग्रा. पं. सदस्य), भाऊसाहेब गवळी, राहुल भोई,मंगेश कदम,महावीर गवळी आदी पालक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे आभार (मुख्याध्यापक) मनोहर वासकर (सर)यांनी मानले.
सततच्या पोटदुखीपासून बचाव करण्यासाठी हे ११ उपाय करा ?
चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक ! वाचा सविस्तर..
“परंपरा विश्वासाची”
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com
🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡
⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !
📲7841913458