महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन

लातूर / प्रतिंनिधी (विशाल मुंडे) :–  महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन लातूरच्या वतीने पुकारण्यात आलेल्या दोन दिवसीय काळी फित आंदोलनास जिल्ह्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. Latur News

यावेळी मुदगड एकोजी ता निलंगा येथे ही प्रशासनाच्या दडपशाही विरोधात काळी फित लावून शिक्षकांनी आंदोलन केले. शाळेवर उपस्थित राहून काळ्या फिती लावून प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध नोंदवला. यात DCPS धारक शिक्षकांसोबत GPF धारक शिक्षकांनीही पाठींबा दिला. १ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना (DCPS) लागू आहे.

अशा शिक्षकांचे त्यांच्या पगारातून दरमहा १०% पगार कपात केला जातो.

मात्र मागील १५ वर्षापासून सदरील शिक्षकांच्या कपात झालेल्या रकमेचा हिशोबच देण्यात आलेला नाही. शासन आदेशानुसार त्यांना R3 नमुन्यात दरवर्षी हिशोब चिट्ठ्या देणे अपेक्षीत होते. परंतु तसा कोणताही पुर्ण हिशोब देण्यात आलेला नाही. यासोबतच सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता जून २०१९ मध्ये द्यायला हवा होता.

तो अजूनही सर्व DCPS धारक शिक्षकांना देण्यात आलेला नाही. या सर्व बाबी पुर्ण करुन नंतरच शिक्षकांचे NPS चे CSRF फॉर्म भरुन घ्यायचे आहेत. मात्र मागील सर्व बाबी प्रलंबीत ठेऊन राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे फॉर्म भरुन घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्यात येतो आहे. त्यात पगार बंद करणे, वेतनवाढ थांबवणे अशा तोंडी धमक्या देऊन बळजबरीने फॉर्म भरुन घेतले जात आहेत.

त्यामुळे DCPS धारक शिक्षक प्रचंड मानसिक तणावात आहेत.

शासन आदेशाचे जाणीवपुर्वक उल्लंघन करुन प्रशासन दडपशाही करत असल्याची भावना त्यांच्यात निर्माण होत आहे. त्याच्या निषेध करत दि.२८ व २९ जूलै रोजी काळ्या फिती लावून शिक्षकांनी काम केले. यावरही प्रशासनाने मागण्या पुर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी यांनी दिला आहे.

लातूर जिल्ह्याचा लातूर पॅटर्न सर्व महाराष्ट्रात परिचित असताना.

तसेच सध्या BALA उपक्रमांतर्गत शिक्षक स्वत:ची पदरमोड करुन शाळांचे सुशोभिकरण व गुणवत्ता वाढीसाठी झटत असताना,

शाबासकी देण्याऐवजी पगार बंद करण्याच्या धमक्या मिळणे. म्हणजे शिक्षकांचे मनोबल कमकुवत करणारे आहे.

सदरील निषेध दिनास लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून,

प्रत्येक जिल्हा परिषद, खाजगी प्राथमिक,  माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच आश्रमशाळा शिक्षकांनीही आपापल्या शाळेवर राहून काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध नोंदवला.

असे सोशल मीडिया प्रमुख नागनाथ सुरवसे यांनी नमूद केले.

आंदोलना वेळी शाळेतील श्री मुंडे सर, बाबळसुरे सर, कावले सर, पाटील सर, श्रीम. भंडारे मॅडम, सोनकांबळे मॅडम आदी उपस्थित होते.

या साईट ला सब्सस्क्राईब करा !

फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा

परंपरा विश्वासाची

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक आनंद पाटील

मुख्य संपादक  – ताम्रध्वज मनाळे.

संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

 

🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !

📲7841913458

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय