जिल्हा प्रतिंनिधी- विशाल मुंडे (मुडगड ए.) महाराष्ट्राचे माजी कृषीमंत्री तथा भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा डॉ अनिलजी बोंडे यांनी पीकविमा व शेतकऱ्यांशी निगडित विषयांबाबत लातूर येथे पत्रकार परिषद घेतली.
आज महाराष्ट्राचे माजी कृषीमंत्री तथा भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा डॉ अनिलजी बोंडे यांनी लातूर येथे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला तसेच पत्रकार परिषद घेऊन पीकविमा व शेतकऱ्यांशी निगडित इतर विषयांबाबत पत्रकारांशी संवाद साधला. २०१९ च्या तुलनेत २०२० साली सोयाबीन व इतर खरीप पिकांच्या उत्पादनात ५०% पेक्षा अधिकची घट झालेली आहे. २०१९ साली शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला होता पण २०२० साली मात्र जवळपास ९०% पात्र शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहेत. जनादेश प्राप्त केलेल्या सरकारला जनमताची आदरयुक्त भीती असते पण जनतेवर लादलेल्या या आघाडी सरकारला ना शेतकऱ्यांची चिंता आहे ना या सरकारचा विमा कंपन्यांवर वचक आहे. आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळं शेतकरी बेहाल झाले आहेत तर ४ हजार कोटींपेक्षा अधिकच नफा कमावून विमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत. एकट्या लातूर विभागात विमा कंपन्यांनी १८०० कोटी रुपयांचा नफा कमावला असून सरकार मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून अंतर्गत कुरघोड्यांमध्ये व्यस्त आहे.
यावेळी सोबत भाजप लातूर जिल्हाध्यक्ष आमदार श्री रमेशअप्पा कराड, शहर जिल्हाध्यक्ष श्री गुरुनाथजी मगे, प्रदेश प्रवक्ते श्री गणेशजी हाके, आमदार श्री अभिमन्यू पावर,माजी आमदार श्री विनायकराव पाटील, श्री शिवाजीराव कव्हेकर, श्री गोविंदअण्णा केंद्रे, जिल्हा परिषद/पंचायत समिती सदस्य व भाजप किसान मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शारीरीक संबध – रेखाचे हे विधांन ऐकून लोकांची झोप उडाली होती; वाचून तुम्हालापण धक्का बसेल!
“परंपरा विश्वासाची”
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
संपर्क–7841913458/9834858058
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com