इंदापूर: आज दिनांक २३जानेवारी हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त प्राथमिक शाळा कालठण नं१ व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना विविध शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले .शिवसेना शाखा कालठण नंबर १ यांच्यावतीने खाऊ, वही, पेन याचे वाटप करण्यात आले.
शिवसेनाप्रमुखांनी आपले संपूर्ण आयुष्य महाराष्ट्राच्या व देशाच्या कल्याणासाठी समर्पित केले. सामान्य माणसांना ताठ मानेने जगायला शिकवले. आजही समाजाला व तरुण वर्गाला त्यांच्या विचारांचे आकर्षण आहे. कालठण येथे समाज उपयोगी कामे करून त्यांचे स्मरण करण्यात आले.
यावेळी बोलताना शाखाप्रमुख मा.शामराव लावंड यांनी सांगितले की, कालठण येथील तरुण सदैव शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनी प्रेरित होऊन वाटचाल करत राहतील आणि इंदापूर तालुक्यामध्ये शिवसेना तिसरा पर्याय म्हणून सक्षमपणे उभी राहील.
याप्रसंगी श्री. भगवान सुर्यवंशी, हर्षल पाडुळे, तुषार घाडगे, प्रताप शेंडगे, प्रमोद चव्हाण, ऋतुराज गटकुळ, सिद्धार्थ साळवे, हनुमंत पांडुळे, अनिल पाडुळे, सुरज जाधव, शिवम गटकुळ, नवनाथ जगताप, संग्राम कदम,शाम लावंड इ.मान्यवर उपस्थित होते.