सोलापूर/प्रतिंनिधी :- कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या (Junior Engineers Association Maharashtra) जलसंपदा विभागाच्या प्रलंबित व विविध मागण्यांबाबत २४ जुलै २०२० रोजी ना. इंजि जयंत पाटील साहेब यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर संघटनेसोबत लावण्यात यावी. अशी विनंती आज शनिवार दि १७/७/२०२१ रोजी पुष्कराज दालन, शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष इंजि शिरीष जाधव यांनी भेट घेऊन केली.
त्यावर मा. ना. इंजि जयंत पाटील मंत्री महोदय यांनी मागील बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत प्रगती झाली किंवा कसे याबाबत आढावा घेण्यासाठी लवकरच संघटने सोबत बैठक घेण्याचे मान्य केले.
तसेच उजनी कार्यालये बंद न करण्याच्या बाबत निवेदन स्विकारले.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचा पदोन्नती मधील रिक्त कोटा ६०० जागांच्या स्वरूपात शिल्लक आहे. व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण असणारे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे पदवी/पदविकाधारक अभियंते आहेत. यांची उपलब्ध संख्या ७०० इतकी आहे. त्यांच्याकडे १०ते १२ वर्षाचा अनुभव आहे. त्यांची त्वरीत पदोन्नती करून या रिक्त जागा भरण्यात यावी अशी विनंती देखील इंजि सतीश साखळकर व इंजि राजाभाऊ कासे यांच्या सोबत निवेदनाद्वारे करण्यात आली.
हे पण वाचा – चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक ! वाचा सविस्तर..
मा. ना. इंजि जयंत पाटील मंत्री जलसंपदा व लाक्षेवि महाराष्ट्र राज्य यांना कनिष्ठ अभियंता संघटनेच्या वतीने विविध मागण्यांबाबत निवेदन शनिवार दि १७/०७/२०२१ रोजी पुष्कराज दालन, शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे सकाळी इंजि शिरीष जाधव अध्यक्ष कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य यांनी दिले.
यावेळी अतिरिक्त संघटन सचिव इंजि धर्मेंद्र बिराजदार, सोलापूर जिल्हा सचिव इंजि राजेंद्र शिंदे, सोलापूर जिल्हा सहसचिव बबलेश्वर कासे, सतीश साखळकर, दिलीप पवार, अमित वाजपेयी, स्वप्नील जगताप, इम्तियाज मणियार, चेतन भांडेकर, संभाजीराव गरड, देवेंद्र धोंगडे, विश्वनाथ मैत्री, श्रीनिवास लिंबोळे,साजीद शेख, अभिजीत गायकवाड,संजय जाधव,सुर्यकांत येमुलकर, सतीश भोसले, उमेश हत्ते इत्यादी सभासद व सहकारी उपस्थित होते.
हे पण वाचा- अधिक्षक अभियंता व प्रशासक इंजि धीरज साळे यांच्या हस्ते इंजि शिरीष जाधव यांचा सत्कार
OMG! 2 लाख 70 हजार प्रती किलो आंबे ! जगातील सर्वात महाग आंबा ? सविस्तर माहिती जाणून घ्या!
“परंपरा विश्वासाची”
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–७८४१९१३४५८ / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com
🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡
⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !
📲7841913458
या साईट ला सब्सस्क्राईब करा !
फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा
Solapur News : प्रणिती शिंदेंना मिळणार मंत्रिपद? राज्य मंत्रिमंडळाचा होणार विस्तार?