प्रतिनिधी – गोविंद पाडूळे : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 18 लाख कर्मचारी रात्री 12 वाजल्यापासून बेमुदत संपावर.सरकारी, नीम सरकारी, महापालिका, नगरपालिका,आरोग्य कर्मचारी परिचारिका, सफाई कामगार इत्यादींचा सहभाग. शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. या संपामुळे रुग्ण, विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत आहे.
राज्य सरकारने चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती,परंतु शिंदे-फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे सर्व कर्मचारी बेमुदत संपावर ठाम आहेत. संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करणार असल्याचे सांगून देखील कर्मचारी संप करण्यावर ठाम आहेत.
इंग्रजांच्या काळामध्ये 1935 पासून पेन्शन लागू झाली. 1982 पासून महाराष्ट्राने पेन्शन योजना लागू केली. 2005 पासून नवीन नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली. ती पुन्हा सुरू करण्यात यावी अशी सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे. राज्य सरकार पुन्हा एकदा या संपावर तोडगा काढण्यासाठी व जुनी पेन्शन योजनेवर चर्चा करण्यासाठी बैठक घेणार आहे.