राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाची बैठक आज एकनाथ शिंदेंसोबत विधिमंडळात पार पडली. यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळातील विश्वास काटकर यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला असल्याची माहिती दिली. परंतु, संपकऱ्यांमध्ये आता दोन गट पडले असल्याचे दिसून येत आहेत. एकीकडे मागणी मान्य झाल्याने जल्लोष सुरु असतानाच अनेक कर्मचाऱ्यांनी निर्णय मान्य नसल्याचे म्हंटले आहे.

अमरावती, अकोला येथील कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत संपावर ठाम असल्याचे सांगितले आहे. कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता संपातील समन्वयकांनी निर्णय कसा घेतला, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, लेखी आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला. याचाच अर्थ पेन्शनच्या मागणीसाठी संपकरी अजूनही कायम असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, बैठकीनंतर जुन्या पेन्शनबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत निवेदन सादर केले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे स्वागत केले असून कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे शिंदे यांनी म्हंटले आहे.

सध्या व्हाट्सअप वर खलील संदेश व्हायरल होत आहे.

अमरावती संप मागे नाही
यवतमाळ संप मागे नाही
गोंदिया जिल्ह्यात संप मागे नाही
पुणे जिल्ह्यात संप मागे नाही
नाशिक जिल्ह्यात संप सुरूच माघार नाही
समन्वय समितीचा निर्णय कोणालाही पटलेला नसल्याचे हळूहळू समोर येत आहे त्यामुळे भूमिका स्पष्ट होईपर्यंत संपर्कात रहावे कोणीही रुजू होण्याची घाई करू नये
नाहीतर पुन्हा उत्साहात चुकीचे पाऊल पडेल ते निस्तारणे आणखी भारी जाईल त्यामुळे आपल्या संघटनेच्या योग्य मार्गदर्शनानुसारच आपण वाटचाल करूया करूया…
मिशन एकच जुनीच पेंशन

विश्वास काटकर यांच्या निर्णयावर महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी नाराज असून त्यांचा राजीनामा मागत आहेत. जुनी पेन्शन योजना जोपर्यंत लागु होत नाही तोपर्यंत संप चालू राहिल अशी भूमिका काही जिल्ह्यातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय