juni pension yojana latest news

juni pension yojana latest news : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यातील सुमारे १८ लाख कर्मचारी मार्च महिन्यात संपावर गेले होते. त्यावेळी राज्य कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अभ्यास समिती स्थापन करण्यात आली होती.

अभ्यास समिती आता जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती वेतन योजनेची शिफारस सरकारला करणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 ➡ समितीला निर्देश देण्यात आले

2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देण्यासाठी पेन्शन योजनेची शिफारस करण्याचे निर्देश समितीला देण्यात आले आहेत. 

या पार्श्वभूमीवर आता या समितीच्या माध्यमातून अभ्यास सुरू झाला आहे.

 कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! मुख्यमंत्री शिंदे घेणार मोठा निर्णय; ‘या’ दिवशी महागाई भत्त्यात होणार 4% वाढ, तारीख झाली फिक्स, पहा….

दरम्यान, अनेक तज्ज्ञांनी समितीला वेगवेगळे पर्याय सुचवण्यास सुरुवात केली आहे. हा पर्याय राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे.

 ➡ सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे

एका प्रतिष्ठित माध्यमाच्या वृत्तानुसार, तज्ज्ञांमार्फत समितीने शिफारस केली आहे की जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे राज्य कर्मचार्‍यांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देणारी पेन्शन योजना देण्यासाठी सेवानिवृत्तीचे वय वाढवावे.

तज्ज्ञांच्या मते, राज्य कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे केल्यास त्यांना निवृत्ती वेतन मिळण्यासाठी अधिक काळ सेवेत राहावे लागेल. 

यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर द्याव्या लागणाऱ्या पेन्शनच्या खर्चात सुमारे 20 टक्क्यांनी कपात होईल.

म्हणजेच तज्ज्ञांची ही शिफारस समितीने मान्य केल्यास राज्यातील कर्मचाऱ्यांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देणारी पेन्शन योजनाही जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच लागू होईल.

आणि सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याची कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी देखील पूर्ण होणार आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे निवृत्ती वेतनाचे वय ६० वर्षे करण्याची मागणी वारंवार केली आहे.

यामुळे अभ्यास समितीने हा निर्णय घेतल्यास त्याचा फायदा निश्चितच राज्यातील कर्मचाऱ्यांना होणार आहे. 

त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढण्याची शक्यता असून, राज्यातील बेरोजगारीचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे.

फक्त 2 मिनिटात तुमच्या फोनवरून आधार कार्डमधील मोबाईल नंबर बदला

मित्रांनो, ताज्या अपडेटसरकारी योजना, देशातील चालू परिस्थिती, ट्रेंडिंग, कृषी, सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक माहितीसाठी

आमच्या http://www.abcmarathinews.com ह्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. किंवा व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉइन होऊ शकता.


एबीसी मराठी न्यूजच्या महत्त्वाच्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवण्यासाठी या समुदायात सामील व्हा.

आमच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हा

क्लिक करा 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय