लना, ABC Marathi News, प्रतिनिधी :  सैराट चित्रपटापेक्षा डेंजर घटना जालना (Jalana murder news) येथे घडली आहे. मुलगी पळून गेल्यानं समाजात बदनामी झाल्याने बाप आणि चुलत्याने या मुलीला भायनक शिक्षा दिली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृत तरुणीच्या पित्यासह तिच्या काकांना अटक केली आहे.

मृत तरुणीचे दूरचा नातेवाईक असलेल्या एका तरुणासह प्रेमसंबध होते. ही तरुणी घरात काहीही न सांगता नातेवाईक असलेल्या तरुणासह तीन दिवस घराबाहेर राहिली.  यामुळे समाजात अपमान झाल्याचा संताप व्यक्त करत मुलीच्या वडिलांनी आणि चुलत्याने तिला झाडाला लटकवून गळफास दिला. ही हत्या नसून तरुणीने आत्महत्या केली असल्याचे भासवण्यासाठी या दोघांनी अगदी नियोजनबद्ध पद्धतीने तिची हत्या केली. यानंतर  अंत्यविधी करुन पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न केला.  गावात चर्चा झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

मनाला हेलावणारी ही घटना जालना तालुक्यातील पिरपिंपळगाव येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी संतोष भाऊराव सरोदे, नामदेव भाऊराव सरोदे अशी या प्रकरमातील संशयीत आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडीलांसह काकांविरुध्द गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की,

चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोहार, पोलीस निरीक्षक झलवार यांना आपल्या पथकासह जालना राजूर रस्त्यावर गस्त घालत असताना पिरपिंपळगाव शिवारामध्ये संतोष भाऊराव सरोदे या व्यक्तीने त्याच्या मृत मुलीचा घाईघाईने अंत्यविधी केला असून यात काहीतरी काळेबेरे असल्याची माहिती मिळाली.

माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी पिरपिंपळगावचे पोलीस पाटील बावणे यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर संतोष भाऊराव सरोदे यांच्या शेतातील वस्तीवर जाऊन संतोष भाऊराव सरोदे व नामदेव भाऊराव सरोदे यांना पोलिसी खाक्या दाखवून विचारपूस करताच घटनेचा उलगडा झाला.

पोलीस चौकशीत आरोपीने सांगितलं की, १७ वर्षीय मुलगी सुरेखा ही मागील २ ते ३ दिवसांपूर्वी घरातून निघून गेली होती आणि ती मंगळवारी दुपारी घरी आली. त्यानंतर न सांगता का गेली व कुठे गेली याची विचारपूस आम्ही केली.

त्यावरून आमच्यात वादही झाला होता. घरातील तरुण मुलगी कुणालाच काहीही न सांगता निघून गेली, ही बाब आजूबाजूला माहीत झाल्याने आमचा अपमान झाला होता. त्यामुळे संतापातून दुपारी ४ वाजताच्या दरम्यान तिला कडुलिंबाच्या झाडाला दोरीने गळफास देऊन ठार मारलं, अशी कबुली आरोपीने दिली आहे.

दरम्यान, पोलिसांनी तत्काळ परिसराची पाहणी केली असता पोल्टी फार्मच्या लगत अंत्यविधी केल्याचे लक्षात आले. तसंच अंत्यविधीनंतरची राख पोत्यात भरून ठेवल्याचे दिसून आले.

पोलिसांनी वेगाने तपास करत संतोष भाऊराव सरोदे व नामदेव भाऊराव सरोदे यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध भादंवी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रागात वडिलांनी उचललेल्या क्रूर पावलामुळे तरुणीला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Lung Cleansing Food: मजबूत-स्वच्छ फुफ्फुसासाठी खा हा 1 पदार्थ, फुफ्फुसांना चिकटलेली घाण व विषारी कण होतील नष्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय