‘पतंजलि योग समिती इंदापूर’ व संजीवन योग सेवा संस्था इंदापूर यांच्या संयुक्त विध्यमाने 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिन तालुका क्रीडा संकुल इंदापूर येथे उत्साहात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला आहे.

सोमवारी दि. 21 रोजी सकाळी ५:३० ते ६:३० या वेळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून, सर्व शासकीय नियमांचे पालन करून प्रत्यक्ष ५० योगसाधक उपस्थित होते. याशिवाय ऑनलाइन पद्धतीने सुमारे १००० पेक्षा जास्त योगप्रेमिंनी योगसाधना करून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.

मागील १७ वर्षापासून तालुका इंदापूर येथील योगशिक्षक श्री दत्तात्रय अनपट, श्री. मदन चव्हाण, श्री. मल्हारी घडगे तसेच योगशिक्षिका मायाताई विंचू व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंदापूर तालुक्यातील लोकांना अखंडितपणे योग प्राणायामाचे मोफत धडे न चुकता देण्याचे काम केले आहे व करत आहेत. योग प्राणायामाच्या माध्यमातून अनेकांना रोगमुक्त केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अखंडितपणे सलग १७ वर्ष (ऑफलाइन व ऑनलाइन) योग प्राणायामाचे मोफत धडे देणारी पतंजलि योग समिती,  इंदापूर ही एकमेव समिती आहे.

इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावात योग पोहचविण्याचे काम या समितीने करून संपूर्ण तालुका योगमय केलेला आहे. ऑनलाइन सत्रामध्ये इंदापूर तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यातील जिल्ह्यातील व राज्यातील योगप्रेमींची उपस्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. समितीकडे सध्या २४ मुख्य योग शिक्षक व १०६ सहयोगी शिक्षक आहेत. या सर्वांच्या सहकार्याने योगप्राणायामाच्या प्रसार व प्रचाराचे काम इंदापूर तालुका पतंजलि योग समिति करत आहे.

खरच इंदापूर तालुक्यासाठी श्री दत्तात्रय अनपट, श्री. मदन चव्हाण, श्री. मल्हारी घडगे, मायाताई विंचू या सर्वांचे कौतुक करावे तेवढे कमी आहेत. सर्वांनी जे योग जागृतीचे कार्य केले ते इंदापूरकरांसाठी न फिठणारे ऋण आहे. सलाम त्यांच्या कार्याला आशाच प्रकराचे कार्य त्यांच्याकडून होवोत. त्यांच्या पुढील कार्यास  ABC मराठी News कडून सुभेच्छा.

 परंपरा विश्वासाची

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक आनंद पाटील

मुख्य संपादक  – ताम्रध्वज मनाळे.

संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

 🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !

📲7841913458

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय