प्रतिंनिधी – मच्छिंद्र साळुंखे – विद्या प्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर मध्ये जागतिक पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात आला पर्यावरणाची सवरक्षण व संवर्धन विषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरण विषयक निर्णय घेण्याची क्षमता व्हावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा हेतू लक्षात घेऊन आपल्या शाळेने विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद असतानाही ५ जून ते १२ जून २०२१ या कालावधीत कृतिशील उपक्रम सप्ताह राबवला होता. या सप्ताहामध्ये इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. indapur vidya pratishtan vidhyalay

indapur vidya pratishtan vidhyalay

भविष्य कालीन शेती, शेतीचे होणारे तुकडीकरण , कमी पडणारे मनुष्यबळ, वाढत जाणारे सिमेंट काँक्रीटचे जंगल, वाढते जागतिक तापमान आणि वितळणारा बर्फ, रहास होत चाललेले पर्यावरण या सर्व गोष्टींचा विचार करून. तसेच मुलांमधे उद्योजकता, सृजनशीलता समस्यापरिहर, या कौशल्यांचा विकास करण्याच्या हेतूने विविध कृतीशील उपक्रम घेण्यात आले.

 

ग्रो सुपरफुड, स्वतःची स्वयंपाक बाग बनवणे, समूह शेती, उभी शेती, मातीविना निवळ पाण्यावरती केली जाणारी शेती, असे सर्व कृतिशील उपक्रम विद्यार्थ्यांनी स्वतः अनुभव घेऊन पूर्ण केले. तसेच निबंध लेखन आणि प्रा. सचिन आरडे सर यांचे पर्यावरण विषयक जाणीव जागृती या विषयावरती विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन केले होते.

indapur vidya pratishtan vidhyalay

हा सप्ताह यशस्वी होण्यासाठी इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूरच्या प्राचार्य सौ. ज्योती जगताप मॅडम यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हा सप्ताह संपन्न झाला. सप्ताहाचे आयोजन व नियोजन श्री नवनाथ वावरे आणि श्री मच्छिंद्र साळुंखे केले.

indapur vidya pratishtan vidhyalay

indapur vidya pratishtan vidhyalay

परंपरा विश्वासाची

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक आनंद पाटील

Reg.No.- UAM-MH-24-0006758

संपर्क7841913458

Email- abcmarathinews१@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमने चालू आहे इच्छुकांनी संपर्क करा

📲7841913458

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय