इंदापूर प्रतिनिधी : गोविंद पाडुळे
इंदापूर पोलीस आले ॲक्शन मोडवर. शहरासोबतच तालुक्यातील सर्व अवैध,बेकायदेशीर गोष्टी, मांगुर वाहतूकीवर कारवाई होणार का?
सध्या काही दिवसांपासून इंदापूर शहरातील पोलीस बेशिस्त वाहतूक व बेशिस्त दुचाकी पार्किंग वाहनांवर कारवाई करत आहेत. त्यामुळे इंदापूर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत अशी जनसामान्यांमध्ये चर्चा आहे. इंदापूर शहरांमध्ये नुकतेच एका अपघातामध्ये जीवितहानी झाली होती,त्यानंतर नागरिकांच्या दबावामुळे पोलिसांनी कारवाई सुरू केली.
पोलीस निरीक्षक म्हणून श्री. प्रदीप सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली आहे. नवीन पोलीस निरीक्षक आल्यानंतर सुरुवातीला जनसामान्यांवर वचक बसवण्यासाठी पोलीस कारवाई करत असतात व काही दिवसांनी परत कारवाई थंड होते असा इंदापूरकरांचा अनुभव आहे.
पोलीस इंदापूर शहरासोबतच इंदापूर तालुक्यातील कानाकोपऱ्यातील गावांमधील चुकीच्या गोष्टींवर व अवैध धंद्यांवर कारवाई करणार की फक्त जनसामान्यांवर जरब बसवण्यापुरतीच कारवाई करणार आहेत? महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील बेकायदेशीर मांगुर उत्पादन व संवर्धनाचा केंद्रबिंदू असणारे कालठण नं.1 येथील बेकायदेशीर मांगुर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर इंदापूर पोलीस कारवाई कधी करणार ? याकडे आता सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.