“वर्दी”तल्या गणरायाचा जंगी जल्लोष ,इंदापूरच्या पोलिसांचा बाप्पाला उत्साहात निरोप
कोरोनाच्या जागतिक संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी सर्वत्र गणरायांचे अतिशय उत्साहात आणि आनंदात आगमन झाले होते.
घरोघरी त्याचबरोबर कार्यालयाच्या ठिकाणी देखील सर्वांनी अतिशय उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. दहा दिवसानंतर आज सर्वत्र गणरायाचे विसर्जन करण्यात येत आहे.
या दहा दिवसात सर्वत्र शांतता व सुव्यवस्था राहावी म्हणून पोलीस प्रशासन अतिशय मेहनत घेते. आपल्या घरातील गणेश उत्सव विसरून सर्वांना या सणाचा आनंद मिळावा म्हणून सर्व पोलीस बांधव प्रयत्न करत असतात.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर पोलीस स्टेशन मधील गणरायांचे देखील आज विसर्जन करण्यात येत आहे.
इंदापूर येथील पोलीस बांधव अतिशय उत्साहाने नृत्य करत करत गणरायाचा निरोप घेताना दिसत आहेत. पोलीस बांधव हलगीच्या तालावर सर्व टेंशन बाजूला ठेउन देहभान विसरून नृत्य करताना दिसत आहेत.
नृत्य करताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा पाहण्यासारखा आहे. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सर्व सामान्याना पुन्हा एकदा खाकी वर्दीतला सामान्य मानुस पहायला मिळाला. पोलीस बांधवांनी देखील गणपती विसर्जनाचा मनसोक्त आनंद घेतला.
bareilly hotel death news मन सुन्न करणारी घटना | नाचता नाचता खाली पडला आणि परत उठलाच नाही