इंदापूर प्रतिनिधी: डॉ. संदेश शहा

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारिता असून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद लोकशाही संवर्धित ठेवण्यासाठी चांगले योगदान देत आहे. त्यामुळे परिषदेच्या मागण्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करून मागण्यांना न्याय देण्यासाठी कटिबध्द आहे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

नरसिंहपूर ( ता. इंदापूर ) येथील नरसिंहराज मंगल कार्यालयात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न पुणे जिल्हा व इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने आदर्श पत्रकार, आशासेविका व सामाजिक कार्यकर्ते यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते तसेच परीषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. शेख यांच्या अध्यक्षतेखाली हा सन्मान सोहळा पार पडला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी सभापती प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, अरविंद वाघ, सचिन सपकळ, सुरेश शिंदे, श्रीकांत बोडके, इरफान शेख, दत्तात्रय तोरसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जनसेवक आमदार दत्तात्रय भरणे,जेष्ठ साहत्यिक व कवयित्री प्रतिभा प्रभाकर गारटकर, आदर्श राजकारणी, इंदापूर नगरपरिषदेस स्वच्छता अभियानात राष्ट्रीय पातळीवर सलग चार वर्ष सुयश संपादून देणाऱ्या, युवक व महिला सक्षमीरणासाठी अनमोल योगदान देणाऱ्या इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्या विचारांचा प्रसार करणारे, माजी सैनिकांच्या विर माता किंवा पत्नी यांचा सन्मान उंचावणारे, विधवा महिला व त्यांच्या मुलांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करणारे डॉ. लक्ष्मण आसबे, सोनाई परिवाराच्या माध्यमातून युवापिढी चे सक्षमीकरण करणारे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने, सर्वसामान्य नागरिकांसाठी करत असलेल्या आदर्श प्रशासकीय कामकाजा बद्दल तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर रोटरी क्लब च्या माध्यमातून तालुक्यात करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल क्लब चे अध्यक्ष नरेंद्र गांधी, उत्कृष्ट युवा उद्योजक अनिल गुळूमकर, शिव पार्वती शाळेची स्थापना करून ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवणारे प्राचार्य रविराज काकडे, इंदापूर तालुक्यातील

शेटफळ हवेली येथील भूमिपुत्र तथा हजारो युवक युवतींचे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक हेमचंद्र शिंदे, कोरोना महामारी मध्ये हजारो अतिगंभीर, गंभीर रुग्णांचे प्राण वाचविणारे रुग्णवाहिका चालक नितीन खिलारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. विस्तार अधिकारी युनूस शेख, ग्रामसेवक गणेश लंबाते, सामाजिक कार्यकर्ते अश्वजित कांबळे, आशासेविका रफिया तांबोळी, सुरेखा

क्षीरसागर, सारिका वाघमारे, स्वाती पाटील, रूपाली चव्हाण, रेशमा सय्यद, पुष्पा ठोकळे, अश्विनी देवळे, मालन जगताप यांना यावेळी सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बारामती पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर तावरे व सहकारी तसेच इंदापूर पत्रकार संघाच्या ७० पत्रकारांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रदीप गारटकर, डॉ. विकास शहा, डॉ. संदेश शहा, हेमचंद्र शिंदे आदींची भाषणे झाली.

स्वागत मनोहर चांदणे, काकासाहेब मांढरे, सुरेश जकाते, धनंजय कळमकर, कैलास पवार, बाळासाहेब जामदार यांनी केले. प्रास्ताविक शौकत तांबोळी यांनी तर सूत्रसंचालन धनंजय दुनाखे यांनी केले. आभार गणेश काकडे यांनी मांडले.

 

१) मकर संक्रांतीच्या सणात आपण तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणतो. आता त्या बरोबरच तिळगुळ घ्या, खरे बोलावं खरे वागा असे वागल्यास अर्थपूर्ण परिवर्तन घडेल असे वक्तव्य प्रदीप गारटकर यांनी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

२) लोकशाहीत जो खरे काम करतो, त्यालाच प्रसिध्दी मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे पत्रकारांनी हे तत्त्व लक्षात घेऊन पत्रकारिता करावी असा सल्ला आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिला.

३) इंदापूर तालुक्याचा भूमिपुत्र असल्याने तालुक्यातील गुणवंत, गरीब, होतकरू विद्यार्थ्यांनी प्रशासकीय, सेवेत महत्वपूर्ण योगदान द्यावे यासाठी इंदापूर तालुक्याचा आदर्श शैक्षणिक पॅटर्न तयार करणार आहे जेणे करून तालुक्यातील पालकांचे कोट्यावधी रुपये वाचतील अशी गर्जना हेमचंद्र शिंदे यांनी करताच त्याचे उस्फुर्त स्वागत झाले.

४) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन ऑगस्ट २०२३ मध्ये मध्यवर्ती ठिकाणी घेण्यात येणार असून त्यास संपूर्ण राज्यातून किमान २ हजार पत्रकार उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये अखिल भारतीय पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा व सर्व तालुका संघाने महत्वपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. शेख यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय