indapur news today

इंदापूर प्रतिनिधी – गोविंद पाडूळे

गेल्या काही दिवसांपासून इंदापुर पोलीस अवैध धंद्यावर कारवाई करत आहेत. मटका,जुगार,चोरी, दरोडा, व गांजा, गुटखा,दारू यांची बेकायदेशीर वाहतूक,वाळू चोरी यासारख्या अनेक गोष्टींवर बेधडक कारवाई केली जात आहे.

इंदापुर येथून  बेकायदेशीर मांगूर वाहतूक करणार्या वाहणांवर कारवाई करण्यासाठी मात्र  इंदापुर पोलीसांना लकवा मारला जातो आहे. पुणे मत्स्य विभागासारखीच इंदापुर पोलीसांची भूमिका संशयास्पद आहे.  इंदापुर पोलीसाचे आर्थिक हितसंबंध मांगूर उत्पादक व वाहतूकदारांशी असावेत. त्यामुळेच इतर सर्व अवैध धंद्यावर कारवाई करत असताना, नागरिकांच्या आरोग्य व जीवीताला अपायकारक आणि निसर्गाला हानीकारक मांगूर वाहतूकीकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे.

उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये परप्रांतीय मच्छीमारांची घुसखोरी व दादागिरी 

श्रीरामपुर पोलीसांनी काही दिवसांपूर्वी मत्स्य व्यवसाय अधिकार्यांच्या मदतीने  मांगूर वाहतूक करणार्या वाहणांवर वाहतूक प्रतिबंध अधिनियमानूसार कारवाई करून मांगूर साठा नष्ट केला होता व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. बाहेरच्या राज्यातून व इतर जिल्ह्यातून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर देखील श्रीरामपूर पोलीस हद्दीमध्ये आल्यानंतर कारवाई केली जात आहे आणि इथे मात्र इंदापूर मधूनच मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयांची उलाढाल  असणाऱ्या मांगुर उत्पादन व वाहतुकीकडे इंदापूर पोलीस दुर्लक्ष करत आहेत. गेल्या 8 ते 10 वर्षापासून बेकायदेशीर मांगूरचे उत्पादन व वाहतूक राजरोसपणे राजकीय वरदहस्ताने सुरू आहे. आजपर्यंत पोलीसांनी एकदाही कारवाई केलेली नाही. यामुळे उजनी धरणात मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे.  लोकप्रतिनिधीना देखील नागरिकांच्या आरोग्याचा विसर पडला आहे.


बेकायदेशीर मांगूर उत्पादनातून पोलीस, मत्स्य अधिकारी व तालुक्यातील राजकीय नेते यांना लाभ होतो आहे? याविषयी नागरिकांतर्फे, आमदार दत्तात्रयभरणे यांना अधिवेशनात ही समस्या मांडण्याची  विनंती करण्यात येनार आहे.

आईच्या मर्जीविरोधात मुलीने केला विवाह, मग सगळं कुटुंबच..viral news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय