राजेवलीनगर येथील साडेतीनशे वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक राजेवली दर्गा येथे खूप वर्षांपासून प्रलंबित असलेल्या काँक्रिटीकरण व पेवर ब्लॉक बसवण्यासाठी कामाचा भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला.

माजी मंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या माध्यमातून सदर काम सुरू झाले. या कामासाठी युवा नेते अरबाझ शेख अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होते. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे काम लवकर सुरू झाले, असे राजेवलीनगर येथील नागरिकांनी सांगितले.

यावेळी शहर अध्यक्ष बाळासाहेब ढवळे,व इंदापूर शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय