इंदापूर प्रतिनिधी : गोविंद पाडळे –पू .प.म.श्री.सातारकर बाबाजी सातारा (कुमार बाबाजी)व प.पू.प.त.श्री.मीराबाईजी शेवलीकर  (सारोळा पुणे) यांच्या उपस्थितीमध्ये मंदिराचे उद्घाटन श्री मूर्ती स्थापना व कलशारोहण संपन्न झाले. श्रीकृष्ण मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दिवसभर आजूबाजूच्या सर्व गावातील भाविकांनी सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.

कालठण येथील सुमनताई सांडभोर (शास्त्री) यांनी स्वकष्टाने व स्वखर्चातून, द्वारकाधीश सेवा ट्रस्ट च्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठे श्रीकृष्ण मंदिर निर्माण केले आहे.

यावेळी बोलताना ट्रस्टचे उपाध्यक्ष अभिजीत सांडभोर यांनी सांगितले की आजूबाजूच्या सर्व गावातील लोकांना मंदिर परिसरामध्ये दर्शन व प्रसाद केला जातो. द्वारकाधीश सेवा ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. भाविकांसाठी व परिसरातील नागरिकांसाठी मदतकार्य, मोफत आरोग्य तपासणी शिबिर व इतर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. येणाऱ्या काळामध्ये लोकसेवक गणपतराव आवटे फाउंडेशनच्या सहकार्याने रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे. मंदिराचे काम अतिशय सुरेख व आकर्षक आहे परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय