इंदापूर प्रतिनिधी : गोविंद पाडुळे – शरद कृषी महोत्सवात इंदापूर येथे रक्तदान शिबिर संपन्न, महिला अध्यक्ष छाया पडसळकर यांनी केले रक्तदान
खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथे आयोजित शरद कृषी महोत्सवात महिला मेळावा, रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी रक्तदानासाठी आवाहन केले. रक्तदानाने कृषी महोत्सवाची सांगता झाली. रक्तदानास शेकडो नागरिकांनी प्रतिसाद दिला.
महिलांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका महिला अध्यक्ष छाया पडसळकर यांनी स्वतः रक्तदान करून सुरुवात केली.
पडसळकर यांनी सांगितले “आदरणीय पवार साहेब यांनी देशातील सर्वच घटकांसाठी तसेच सर्व क्षेत्रांमध्ये जेवढे कार्य केले आहे तेवढे देशातील इतर कोणत्याही नेत्यांनी केलेले नाही.महिला सक्षमीकरणासाठी पवार साहेबांनी फार मोठे कार्य केले आहे. त्यांच्यामुळेच महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाले. राजकारण,क्रिडा, व्यवसाय,शिक्षण व समाजामध्ये महिला सर्वच क्षेत्रांमध्ये आज पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना पुरुषांच्या एक पाऊल पुढे आहेत.”
तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी पवार साहेब यांना दीर्घायुष्य लाभो व समाजातील सर्वच घटकांना न्याय मिळवून देण्याच काम पवार साहेबांनी केलं आहे अशी भावना व्यक्त केली.
यावेळी संजय रुपनवर,संजय देवकर,रेहनाताई मुलाणी, सचिन खामगळ,प्रफुल्ल पवार, समाधान बोडके, अक्षय कोकाटे, सागर पवार ,प्रशांत गायकवाड,विकास खिलारे, हर्षल पाडुळे उपस्थित होते.