इंदापूर:- परतीच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले असून, त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या मध्यमातुन शासनास इंदापूर तालुक्याच्या काँग्रेस कमिटी विविध मागण्यांसाठी निवेदन दिले आहे. इंदापूर तालुक्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहिर करा . हेक्टरी ७५ हजार रूपये मदत करावी. मंजुरीसाठी अनुदान जाहिर करावे, अशा विविध मागण्यांसाठी निवेदन दिले.
मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे जागतिक भुक निर्देशकात भारताची घसरण झाली असून जगात १२१ देशपैकी १०७ व्या क्रमांकावर आपला देश आला आहे. हे अतिशय खेदजनक आहे .
भारताची हि प्रतिमा सुधारण्यासाठी शेतकरी हिताचे व्यापक धोरण केंद्र सरकारकडून आखण्यात यावेत . राज्यात ओला दुष्काळ जाहिर करून दिवाळी पुर्वी भरीव मदत जाहिर करण्याबाबत . राज्यात गेले ५ महिने सातत्याने मोठया प्रमाणात पाऊस पडत असून नुकसान झाले आहे . आम्ही ” वरील मागण्याचा सरकारने सहानभुती पुर्वक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा व शेतकयांना दिलासा द्यावा आशी मागणी स्वप्निल बा . सावंत अध्यक्ष , इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी सदस्य , पुणे जिल्हा विद्युत वितरण दक्षता समिती तहशीलदार श्रीकांत पाटील यांच्या वतीने पुरवठा अधिकारी आनगारे यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत, जिल्हा सरचिटणीस जाकीर भाई काजी , शहराध्यक्ष चमनभाई बागवान, किसान काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर संतोष होगले, खजिनदार भगवान पासगे ,तालुका सरचिटणीस श्रीनिवास शेळके, महादेव लोंढे, अनुसूचित जाती जमाती विभागाचे तालुका अध्यक्ष युवराज गायकवाड, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष नाशिर शेख,बंडलकर आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते