indapur news

इंदापूर तालुक्यातील पुणे- सोलापूर हायवे वरती असलेल्या वरकुटे पाटी येथे अनोळख्या इसमाने गाडीवरती गोळीबार करत गाडीतील ३ कोटी ६० लाख रुपयाची रोख रकमेसह एकुण ३ कोटी ६० लाख 26 हजार रुपयांची चोरी करून चोर पसार होण्यात यशस्वी झाले आहेत.

सविस्तर माहिती अशी की शुक्रवार दि.२६ रोजी भावेशकुमार अमृत पटेल, वय ४० , रा- कहोडा, तालुका- उंझा, जिल्हा-मेहसान(गुजरात) सध्या राहणार पंचरत्न बिल्डिंग मुंबई यांनी ३ कोटी ६० लाख २६ हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार दिली आहे.

सदर तक्रारी मध्ये दि.२६ रोजी रात्री ०२:०० वाजून 30 मिनिटांच्या सुमारास मौजे वरकुटे पाटी गावच्या हद्दीमध्ये असलेल्या स्पीड ब्रेकर वरती स्कार्पिओ गाडी नंबर टी एस ०९ ई एम ५४१७ ही गाडी सोलापूर वरून पुणे कडे जात असताना. चार अनोळक्या इसमांनी पायी चालत येऊन हातामध्ये लोखंडी टॉमी दाखवून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.

परंतु गाडी भरधाव वेगाने सोलापूर कडून पुण्याच्या बाजूने घेऊन जात असताना सदर गाडीच्या पाठीमागे मारुती सुझुकी कंपनीची चार चाकी स्विफ्ट गाडी व टाटा कंपनीची गाडी मधून सदर चोरट्यांनी स्कार्पिओ गाडीचा पाटला करूनही गाडी का थांबवली जात नाही. म्हणून गाडीवरती गोळीबार करत गाडी रस्त्यामध्ये अडवून गाडी मधील दोन व्यक्तींना हाताने मारहाण करत गाडीमधील रोख रक्कम ३ कोटी ६० लाख रुपये व जवळील १४ हजार रुपये, तसेच  एक विवो कंपनीचा १२ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असे एकूण ३ कोटी ६० लाख २६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला आहे. अशी तक्रार इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे.

सदर अनोळखी चोरट्यांच्या विरोधात भादवि कलम ३९५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेशकुमार धस, पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस निरीक्षक घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी भेट दिली आहे. सदर गुन्ह्याच्या तपासाकामी पाच पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय