इंदापूर प्रतिनिधी: कालठण गावचे सुपुत्र व प्रसिद्ध सिनेअभिनेते भीमसेन चव्हाण यांचा वाढदिवस कालठण येथे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. तोफा वाजवून हलगीच्या कडकडाटात आनंद साजरा केला गेला. 

          आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ संपादक असणारे भीमसेन चव्हाण यांनी  विविध मालिका व अनेक चित्रपटात काम केले आहे. रुपेरी पडद्यावर व प्रत्यक्ष जीवनात विविध भुमिका साकारणारे चव्हाण हे अनेक तरुणांसाठी आदर्श व मार्गदर्शक आहेत. ग्रामीण भागातून येऊन कला क्षेत्रात व रुपेरी पडद्यावरील एक यशस्वी नट, हिरो म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली  आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे. सामाजिक ऐक्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेक्षेत्रात नाव असनारे चव्हाण यांच्यामुळे कालठण गावाचा संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक वाढला आहे.

  यावेळी शामराव लावंड यांनादेखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन स्नेह व्यक्त करण्यात आला. सदर वाढदिवस सोहळ्यास  नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून चव्हाण साहेब व शामराव लावंड यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय