इंदापूर / प्रतिंनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी श्री. भाऊसाहेब रुपनवर यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक २१ जून २०२१ ते १ जुलै २०२१ या कालावधी मध्ये कृषी संजीवनी मोहीमेतंर्गत इंदापूर तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत बीज प्रक्रिया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर , ऊस लागवड तंत्रज्ञान ,रुंद वरंबा सरी पद्धत अशा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
याच मोहिमेतंर्गत मौजे बेडशिंगे ता. इंदापूर येथील यादव वस्ती या ठिकाणी दिनांक २४ जून २०२१ रोजी महिलांच्या शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळ कृषी अधिकारी गणेश सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना ऊस लागवड तंत्रज्ञान व सुपर केन नर्सरी विषयक मार्गदर्शन केले. तसेच यावेळी रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
बीबीएफ तंत्रज्ञान म्हणजेच रुंद वरंबा सरी पद्धत ही अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये वरदान ठरत आहे ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो अशा ठिकाणी या तंत्रज्ञानामुळे जलसंवर्धन होते तसेच पाऊस जास्त झाल्यास पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने झाल्यामुळे पिकांचे नुकसान टळते या यंत्राने पेरणी केल्यास खत व बियाणे यांमध्ये बचत होते तसेच उत्पादनामध्ये 20 ते 25 टक्के वाढ होते. आंतरपीक पेरणी करण्यासाठीही बीबीएफ तंत्रज्ञान वापरले जाते असे कृषी सहाय्यक अनुपमा देवकर यांनी सांगितले. यावेळी कृषि पर्यवेक्षक श्री.कल्याण पांढरे यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड गांडूळ खत युनिट ,नाडेप युनिट विषयी माहिती दिली.
हे हि वाचा – खरीप मका पिकाची शेतीशाळा मौजे बेडसिंगे येथे कृषी विभागामार्फत घेण्यात आली.
सदर कार्यक्रमास उपस्थित महिलांनी वडाचे रोप लावून वटपौर्णिमा साजरा करून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. यावेळी मंडळ कृषी कार्यालयाचे ए. एच. कलाल, ए .के. कदम, अतुल जावळे , संदीप घुले व प्रगतीशील शेतकरी बबन काळे, गणेश यादव,अरूण काळे उपस्थित होते.
चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक ! वाचा सविस्तर..
OMG! 2 लाख 70 हजार प्रती किलो आंबे ! जगातील सर्वात महाग आंबा ? सविस्तर माहिती जाणून घ्या!
“परंपरा विश्वासाची”
🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡
⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !
📲7841913458
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com