प्रतिनिधी :- श्रीयश नलवडे

इंदापूर (२१ जून ) : आज २१ जुन हा जागतिक योग दिन आहे.  त्यानिमित्ताने इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाने ऑनलाइन योग प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतला. आयोजित केलेल्या ऑनलाइन योग प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी योग प्रशिक्षण आणि अभ्यासाला जीवनामध्ये अतिशय महत्त्व असून आनंदी, निरोगी आणि सकारात्मक विचारांसाठी योगाला महत्त्व असल्याचे सांगितले.

पतंजली योग समितीचे मार्गदर्शक दत्तात्रेय अनपट आणि समितीचे सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी वेगवेगळ्या प्रकारची आसने, प्राणायामाचे प्रकार ऑनलाइन प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून तसेच योगला असलेले महत्त्व यावेळी सांगण्यातआली.

प्राचार्य डॉ. संजय चाकणे, दत्तात्रेय अनपट, उपप्राचार्य नागनाथ ढवळे, डॉ.शिवाजी वीर, डॉ.भिमाजी भोर,डॉ. सदाशिव उंबरदंड यांनी दीपप्रज्वलन करून योग प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात झाली.

जागतिक योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ दत्तात्रेय अनपट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तालुक्यामध्ये सर्वत्र योग जागृती करण्याचे मोठे कार्य केले आहे. कोरोना पार्श्वभूमीवर योगास असलेले महत्त्व अधिकच स्पष्ट झाले आहे. इंदापूर नगरपालिकेच्या माध्यमातून योगभवन उभारले जाणार आहे. तरुण पिढी, प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, इंग्रजी माध्यमाची विद्यार्थी यांना या ऑनलाइन योग प्रशिक्षणाच्या माध्यमातून योगाचे आणि प्राणायामाचे महत्व समजणार आहे.आनंदी,निरोगी आणि सकारात्मक विचारासाठी योगाला महत्व असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.’

दत्तात्रेय अनपट म्हणाले की,’ताण तणाव विरहीत जीवनासाठी योगाला अतिशय महत्त्व आहे. आरोग्यासाठी योग महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने योग केला पाहिजे. योगाने आपली दररोजची सुरुवात झाली पाहिजे.’

क्रीडा संचालक डॉ.भरत भुजबळ यांनी आभार मानले.

सकाळच्या प्रसन्न वातावरणात हजारो विद्यार्थ्यांनी, पालकांनी व शिक्षकांनी यु ट्यूब, फेसबुक आणि झूम द्वारे या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com
 🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡
⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !
📲7841913458

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय