इंदापूर प्रतिनिधी :- गोविंद पाडुळे Indapur Accident news
इंदापूर शहरामधील कला, विज्ञान,वाणिज्य कॉलेज समोर हायवे वर शनिवारी ऊस वाहतुकीच्या भरधाव रिकाम्या ट्रॅक्टर मुळे एका सोळा वर्षीय शाळकरी मुलीचा अपघातामध्ये मृत्यू झाला.
त्यामुळे सर्वत्र नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. ऊस वाहतूक करणारे रिकामे ट्रॅक्टर अतिशय भरधाव वेगाने शहरांमधून जात असतात.तसेच प्रशासना विरोधात नागरिकांचा रोष वाढला आहे. सजग नागरिकांनी एखाद्या अडचणीवर आवाज उठवल्यावर प्रशासनाने दुर्लक्ष करणे ही समाजासाठी काही नवी गोष्ट नाही.
परंतु एखाद्या मनुष्याची जीवित हानी होऊ शकते असा नागरिकांनी अंदाज वर्तवल्यानंतर देखील त्या गोष्टीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असेल तर जबाबदार कोणाला धरायचे?
मागच्या महिन्यामध्येच बाल दिनानिमित्त श्रीकांत मखरे या युवकाने इंदापूरचे तहसीलदार, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांना इंदापुरातून होणाऱ्या जड वाहतुकीमुळे जीवित हानी होऊ शकते अशा आशयाचे निवेदन दिले होते व त्यावर उपाययोजना करण्याची विनंती केली होती. परंतु संबंधितांनी सदर अर्जाकडे लक्ष दिले नाही.
त्यामुळे एका निष्पाप मुलीचा जीव गेला अशी चर्चा आहे. संबंधितांवर कारवाई करण्यासाठी व अपघातात प्राण गमावलेल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी श्रीकांत मखरे व विशाल गार्दी यांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजितदादा पवार साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
जीवितहानी झाल्यानंतर आता तरी प्रशासनाला जाग येणार का?रस्त्यावरती असणारी बेशिस्त वाहतूक, रस्त्यावरती लावली जाणारी दुचाकी वाहने तसेच छोट्या विक्रेत्यांची रस्त्यावरील अतिक्रमणे याच्यावर नगरपालिका प्रशासन व पोलीस कारवाई करणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
विकास कामे करण्यासाठी सक्रीय असणारे सर्व सत्ताधारी नागरिकांच्या जीविताला धोका होणाऱ्या अडचणींकडे मात्र लक्ष देत नाहीत असे नागरिकांनी सांगितले.
नवरदेवाची भन्नाट एन्ट्री! चक्क कुत्र्यासोबत आला बाईकवर बसून, Video व्हायरल