Hero Festive Offer : सणासुदीचा हंगाम सुरू होताच देशातली सर्वात मोठी दुचाकी वाहन उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने त्यांच्या मोटरसायकल आणि स्कूटर्सवर आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. कंपनीने नवरात्रीदरम्यान, त्यांच्या वाहनांवर ५ हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काऊंट ऑफर्स जाहीर केल्या आहेत. कंपनी त्यांच्या ग्रँड इंडियन फेस्टिव्हल ऑफ ट्रस्टअंतर्गत ऑफर्स जाहीर केल्या आहेत, तसेच नवीन वाहनं लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या ऑफर्स २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या काळात वैध असतील. तर काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, या ऑफर्स दिवाळीतही उपलब्ध असतील.

हिरो मोटोकॉर्प कंपनी त्यांच्या कम्यूटर आणि प्रीमियम बाइक्सवर २,१०० रुपयांची रोख सूट देत आहे. या ऑफर्समध्ये हिरो एचएफ डिलक्स, स्प्लेंडर प्लस, पॅशन प्रो, ग्लॅमरसारख्या बाइक्सचा समावेश आहे. स्कूटर्सबद्दल बोलायचं झाल्यास कंपनी त्यांच्या प्लेजर प्लस, मायस्ट्रो एज, डेस्टिनी १२५ सारख्या स्कूटर्सवर ३,००० रुपयांचा डिस्काऊंट देत आहे. हिरोच्या स्कूटर्स ‘सुपर सिक्स धमाका पॅकेज’अंतर्गत खरेदी करता येतील. यामध्ये एक वर्षाचा विमा, २ वर्षांचा मोफत मेन्टेनन्स, ३,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस, ४,००० रुपयांचं गुडलाईफ गिफ्ट व्हाऊचर, ५ वर्षांची वॉरंटी आणि शून्य टक्के व्याजासह ६ महिन्यांच्या ईएमआयचा पर्याय देत आहे.

प्रीमियम मोटरसायकल स्वस्तात खरेदी करता येणार

हिरो मोटोकॉर्प कंपनी त्यांच्या प्रीमियम रेंजमधील बाइक्सवर देखील ऑफर्स देत आहे. यामध्ये १६० आर, एक्सपल्स २०० आणि स्ट्रीम २०० एसवर ५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे. सूट आणि अन्य लाभांशिवाय हिरो मोटोकॉर्प कंपनी विक्री वाढवण्यासाठी सणासुदीच्या काळात नवीन उत्पादनं लाँच करेल.

 

हे पण वाचा: रितेश देशमुख चे पहिले प्रेम जेनेलिया नाही, मग कोण?

Hero Xtreme 160R Stealth Edition 2.0 लाँच

दरम्यान, हा सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी हिरोने याच आठवड्यात एक्स्ट्रीम १६० आर स्टेल्थ एडिशन २.० (Hero Xtreme 160R Stealth Edition 2.0) ही बाइक लाँच केली आहे. या बाइकची किंमत कंपनीने १.३० लाख रुपये इतकी ठेवली आहे. ही एक्स शोरूममधली किंमत आहे. नवीन स्टेल्थ एडिशनमध्ये मॅट ब्लॅक आणि रेड इन्सर्ट हे रंगांचे पर्याय देण्यात आले आहेत. नवीन रंगांसह ही बाइक अधिक आकर्षक दिसू लागली आहे.

 

Best CNG Car – आता कारचे स्वप्न पूर्ण करा स्वस्तात, Alto पेक्षा पण जास्त या कारला मिळतेय ग्राहकांची पसंती; किंमतही कमी, मायलेजही जबरदस्त ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय