Know the Symptoms of Heart Attack : हार्ट अॅटॅक येण्याआधी काही ना काही संकेत शरीर नक्की देत असते ही लक्षणे आपण वेळीच ओळखायला हवीत.

Highlights

  • नियमितपणे व्यायाम करणे, सात्विक आणि घरचा आहार घेणे, ताणविरहीत जीवन जगणे, पुरेशी झोप घेणे आणि शक्य तितके आनंदी राहणे आवश्यक आहे.
  • एकाएकी हार्टअॅटॅक आला असे आपण म्हणतो खरे पण हार्ट अॅटॅक येण्याआधी काही ना काही संकेत शरीर नक्की देत असते.

हार्ट अॅटॅक ही सध्या सामान्य समस्या झाली आहे. हृदयाला रक्तपुरवठा करण्याच्या कामात अडथळा निर्माण झाल्याने हार्ट अॅटॅक येतो आणि व्यक्तीचा जागच्या जागीच जीव जातो. गेल्या काही वर्षात कमी वयातील व्यक्तीनांही हार्ट अॅटॅकमुळे आपला जीव गमवावा लागत आहे. कधी जीममध्ये व्यायाम करताना तर कधी घरात नाहीतर ऑफीसमध्ये काम करताना अचानक हार्ट अॅटॅक आल्याने व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे आपण ऐकतो. इतकेच नाही तर कधी रात्री झोपेतही हार्ट अॅटॅकमुळे व्यक्तीला प्राण गमवावे लागते. एकाएकी हार्टअॅटॅक आला असे आपण म्हणतो खरे पण हार्ट अॅटॅक येण्याआधी काही ना काही संकेत शरीर नक्की देत असते ही लक्षणे आपण वेळीच ओळखायला हवीत. ती ओळखू शकलो तर आपण स्वत:चा जीव नक्कीच वाचवू शकू. मात्र यासाठी आपल्याला योग्य ती माहिती असणे आवश्यक आहे. पाहूयात हार्ट अॅटॅक येण्याआधी शरीरात कोणती लक्षणे दिसतात ते समजून घेऊया (Know the Symptoms of Heart Attack).

हार्ट अॅटॅकची सामान्य कारणे.

१. लठ्ठपणा

२. डायबिटीस

३. कोलेस्ट्रॉल

४. उच्च रक्तदाब

५. हाय फॅट डाएट

६. सिगारेट ओढणे आणि अति प्रमाणात दारुचे सेवन

हृदयाचे कार्य संतुलित ठेवायचे असेल तर नियमितपणे व्यायाम करणे, सात्विक आणि घरचा आहार घेणे, ताणविरहीत जीवन जगणे, पुरेशी झोप घेणे आणि शक्य तितके आनंदी राहणे आवश्यक आहे. इतकेच नाही तर हृदयाचे आरोग्य सुरळीत ठेवायचे असेल तर कोलेस्ट्रॉल, वजन आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला वरीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवत असल्यास वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे हार्ट अॅटॅक येऊन आपला जीव गमावण्याची शक्यता कमी होते.

१. प्रमाणापेक्षा जास्त थकवा येणे.

२. झोप येण्यात अडचणी येणे.

३. सतत कसलातरी ताण जाणवणे.

४. हृदयाची धडधड वाढणे.

५. करपट ढेकर येणे.

६. भूक कमी होणे.

७. हाता-पायांना मुंग्या येणे.

८. रात्रीच्या वेळी श्वास घेण्यात अडथळा.

९. विचारांमध्ये किंवा स्मृतीमध्ये बदल होणे.

१०. दृष्टीबदल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय