थंडीच्या दिवसात नियमितपणे गूळ खाणे आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते जाणून घ्या
अनेकजण गोड पदार्थ बनवताना साखरे ऐवजी गुळाचा वापर करतात. मधुमेह असणा-या व्यक्तीने साखरे ऐवजी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. गूळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते, असे आपण बऱ्याचदा ऐकतो. हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलानुसार गूळ खाणे अधिक फायदेशीर ठरते. त्यामुळे हिवाळ्यात दररोज किमान एक तुकडा गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. हिवाळ्यात गूळ खाणे कसे फायदेशीर ठरते जाणून घ्या.
हिवाळ्यात गूळ खाण्याचे फायदे:
सांधेदुखीत आराम मिळतो.
गुळामुळे सांधेदुखीपासूनही आराम मिळेल. रोज सकाळी गुळाचे सेवन केल्याने सांधेदुखीमुळे होणाऱ्या इतर समस्यांपासून आराम मिळतो. असे मानले जाते की सकाळी गूळ खाल्ल्याने शारीरिक आणि हाडांची रचना सुधारते.
रक्ताभिसरण व्यवस्थित होते
हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे अनेकदा रक्ताभिसरणाचा वेग मंदावतो. यासाठी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. गूळ खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. गुळात आढळणारे लोह रक्ताभिसरणाची गती वाढवते आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करते.
वजन नियंत्रणात राहील
पचनशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाऊ शकता. कारण असे मानले जाते की, ते खाल्ल्याने वजनही नियंत्रणात राहते. याशिवाय तुमची पचनशक्तीही मजबूत होते. म्हणजेच गूळ खाल्ल्याने पोटातील कोणत्याही प्रकारची अपचनाची समस्याही दूर होईल.
छाती जड होण्याच्या समस्येवर उपाय
दमा, ब्राँकायटिसचा त्रास असणाऱ्यांना हिवाळ्यात छाती जड होण्याचा त्रास वाढू शकतो. अशात गूळ खाणे हा त्रास कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. गुळामध्ये अंतीबॅक्टरियल आणि अँटी इम्प्लॉयमेंटरी गुणधर्म आढळतात जे फुफुसांमधील सूज कमी करून, त्यामध्ये जाणवणारा जडपणा कमी करण्यास मदत करतात.
सतत पोटात होणाऱ्या गॅसवर ठरते फायदेशीर
गूळ खाल्ल्याने पोटातील अॅसिडीक पीएच योग्य राहण्यास मदत मिळते. तसेच यामुळे अॅसिडीटी आणि पोटात सतत होणाऱ्या गॅसपासून सुटका मिळण्यास मदत होते. अॅसिडीटी झाल्यास पाण्यात गूळ टाकून ते पाणी प्या, यामुळे अॅसिडीटीपासून सुटका मिळण्यास मदत मिळेल. यासह पोट फुगण्याच्या समस्येवरही गूळ खाणे फायदेशीर मानले जाते.
गूळ खाण्याची योग्य वेळ
दुपारी जेवणानंतर गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मेटाबॉलिक रेट वाढतो आणि पोटाचे विकारही टाळता येतात. तसेच यामुळे अन्नपचन होण्यास मदत मिळते.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)