health tips

हिवाळ्यात बर्‍याच लोकांचे मेटाबॉलिजम (चयापचय) मंदावते, ज्यामुळे नियमितपणे मलत्याग करणे हे कठीण होते. त्यामुळे पोटाचा त्रास कायम राहतो. म्हणून, त्याचे मूळ कारण समजून घेणे महत्वाचे आहे, ज्यामुळे आपण समस्येपासून मुक्त होऊ शकू. health tips in marathi

1) अधिक जंक फूड खाणे

  • थंडीच्या दिवसांत लोकांना चविष्ट पदार्थांचा स्वाद घेणे खूप आवडते.
  • पण जंक फूडमुळे केवळ तुमचे पचन मंदावत नाही तर ब्लोटिंग सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात,
  • ज्यामुळे पाचक आरोग्याला हानी पोहोचू शकते.
  • जंक फूड हे चविष्ट तर असते पण त्यात आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असतो,
  • यामुळे इर्रिटेबल बाऊल सिंड्रोमदेखील होऊ शकतो. जंक फूड व्यतिरिक्त, प्रक्रिया केलेले अन्न खाणे देखील टाळावे.
  • त्याऐवजी तुम्ही शिजवलेल्या भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्ये, ताजी फळे आणि बिया खाऊ शकता.
  • तसेच मसालेदार अन्नापासून दूर रहावे कारण त्यामुळे छातीत जळजळ आणि पोटदुखी होऊ शकते.
  • तसेच प्रमाणात खावे, अति खाल्यानेही पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. Health Tips in Marathi

2) पुरेसे पाणी न पिणे

  • तापमानात घट झाल्यामुळे, आपण पाण्याचे सेवन देखील कमी करतो.
  • शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी दररोज पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.
  • शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे, आतड्यांना अन्न पचण्यास त्रास होतो आणि बद्धकोष्ठता होऊ शकते.
  • त्यामुळे, हिवाळ्यात पचनाच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी पुरेसे पाणि किंवा द्रव पदार्थांचे सेवन करण्याचा प्रयत्न करा.

3) कार्बोनेटेड पेय

  • थंडी सुरू होताच, या काळात सोडा आणि कोल्ड्रिंक्ससारख्या पदार्थांच्या जागी कॉफी किंवा फळांचा रस सेवन करावा. कोल्ड्रिंक्ससारख्या पेयांमध्ये भरपूर साखर व असे घटक असतात, ज्यामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते आणि वेदना होऊ शकतात. याशिवाय अशा पेयांमुळे आपल्या दातांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

4) तणाव

हिवाळ्यातील थंड हवा काही वेळा आपल्या शरीरासाठी आणि विशेषतः पचनसंस्थेसाठी तणावपूर्ण ठरू शकते. यामुळे पोटात कळ येणे, पोट फुगणे आणि भूक न लागणे असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे नियमितपणे व्यायाम करणे, योगासने, मेडिटेशन, चालायला जाणे, अशा क्रिया कराव्यात. यामुळे तणावमुक्त राहता येते.

5) झोपेची कमतरता

चांगली झोप ही एक औषध म्हणून काम करते, ज्यामुळे अनेक समस्या दूर होतात. झोपेच्या कमतरतेमुळे तणावाची पातळी वाढू शकते जे आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले नाही. चांगली झोप म्हणजे उत्तम स्ट्रेस मॅनेजमेंट. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने कमीतकमी 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे.

वरील सर्व कारणांव्यतिरिक्त, अपचन आणि पोटदुखीशी संबंधित वेदना कमी करण्यासाठी स्वतःला उबदार ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे. त्यामुळे हिवाळ्यात पुरेसे उबदार कपडे घालावे.

Health Tips in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय