आलापल्ली येथे श्री हनुमान जन्मोत्सव राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा..

हरियाणा येथील महाबली हनुमान जनतेच्या आकर्षणाचा केंद्र, लोकांची तुडुंब गर्दी..!!

टायगर ग्रुप आल्लापल्ली तर्फे भव्य हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बजरंग चौक व श्रीराम मंदिर येथे राजे साहेबांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

तसेच संध्याकाळी मुख्य मार्गाने भव्य शोभायात्रा काढण्यात आली या मिरवणुकीत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून श्री हनुमानाचे पूजन व आरती करीत भक्तीभावाने दर्शन घेतले.

तसेच पायदळी ह्या शोभायात्रेत सहभागी झाले तसेच उपस्थित भक्तगणांना राजेंनी श्री हनुमान जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा दिले. यावेळी युवकांचा आग्रहास्तव डीजेच्या तालावर राजे साहेबांनी ठेका ही धरला तसेच ह्या शोभायात्रेत हरियाणा येथील महाबली हनुमान जनतेच्या आकर्षणाचे मोठे केंद्र होते, ह्या शोभायात्रेत लोकांची तुडुंब गर्दी झाली होती..!!

याप्रसंगी अहेरी व आलापल्ली येथील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!

⇒  UPI Payment new rules वर द्यावा लागणार १.१ टक्का चार्ज, चुकूनही या पद्धतीने करू नका पेमेंट

⇒  positive thoughts in marathi : जीवनात आनंदी राहण्यासाठी रोज हे पाच काम करा.

⇒  बुलडाण्यात विषारी सापाच्या पोटातून निघालं असं काही की बघण्यासाठी उसळली गर्दी, VIDEO पाहून व्हाल शॉक

⇒  कमी भांडवलामध्ये हे व्यवसाय करा आणि मालामाल व्हा ?

⇒  कमी भांडवलामध्ये हे व्यवसाय करा आणि मालामाल व्हा ?

⇒  आईच्या मर्जीविरोधात मुलीने केला विवाह, मग सगळं कुटुंबच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय