दिलीप कुमार हे भारतीय चित्रपट सृष्टीतील अतिशय महत्वाचे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड झाले आहे. त्यामुळे भारतीय चित्रपट सृष्टीसह जगभरातील त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. अशा या महान व्यक्ती बद्दल आपण काही महत्त्वाच्या न ऐकलेले किस्से जाणून घेणार आहोत. dilip kumar unknown facts
१) दिलीप कुमार कोणत्या धर्माचे आहेत ? (Dilip Kumar belongs to which religion?)
आपणाला ऐकून आश्चर्य वाटेल की दिलीप कुमार हे हिंदू नसून एक मुस्लिम धर्मीय कलाकार आहेत. त्यांचा जन्म भारतात झाला नसून पाकिस्तान मध्ये लाहोर या शहरांमध्ये 11 डिसेंबर 1922 रोजी झाला. ते आपल्या वडिलांच्या १४ अपत्यांपैकी चौथ्या क्रमांकाचे अपत्य आहेत.
२) दिलीप कुमार यांचे खरे नाव:- (Dilip Kumar’s real name)
दिलीप कुमार यांचं खरं नाव महंमद युसुफ खान आहे. त्यांच्या वडिलांना फिल्मी दुनिया मध्ये काम केलेलं अजिबात आवडत नव्हतं त्यामुळे त्यांनी वडिलांपासून आपले काम लपवण्यासाठी त्यांनी आपले नाव सुरूवातीला दिलीप कुमार असे ठेवले होते. ते पुढे तसेच कायम राहिले.
३) दिलीप कुमार यांचे लग्न:- (Dilip Kumar’s wedding)
दिलीप कुमार यांनी वयाच्या 44 वर्षी सायराबानू यांच्याबरोबर प्रेम विवाह केला. त्या दोघांमध्ये वयाचे तब्बल 22 वर्षाचे अंतर होते, त्याकाळी हा विवाह प्रचंड गाजला होता.
४) दिलीप कुमार यांची दुसरी पत्नी:- (Dilip Kumar’s second wife)
दिलीप कुमार यांना सायराबानू पासून अपत्य नसल्यामुळे त्यांनी 1981 ला आसमा रहमान यांच्याबरोबर दुसरा विवाह केला होता. परंतु हा विवाह फार काळ टिकला नाही फक्त दोन वर्षात त्यांचा काडीमोड झाला.
५) दिलीप कुमार यांनी पुणे येथे सँडविच विकले ? (Dilip Kumar sells sandwiches in Pune)
दिलीप कुमार यांनी आपल्या सुरुवातीच्या काळात आर्थिक स्वावलंबनासाठी पुणे येथे एका हॉटेल मध्ये सँडविच विकण्याचे काम केले होते.
6) दिलीप कुमार यांचे प्रेम प्रकरण – Dilip Kumar’s love affair
दिलीप कुमार यांचे मधुबालावर अत्यंत प्रेम होते, त्यांनी भर कोर्टात आपले मधुबालावर प्रेम आहे व या पुढेही असणार आहे असे स्पष्ट शब्दात सांगितले होते. परंतु काही कारणास्तव या दोघामध्ये दुरावा निर्माण झाला.
7) ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार – Tragedy King Dilip Kumar
दिलीप कुमार यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक ट्रॅजेडी रोल निभावले. ‘नया दोर’, ‘दिदार’, ‘आन’ देवदास’, या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयामुळे त्यांना ट्रॅजेडी किंग असे नाव पडले. परंतु वारंवार हा रोल करून त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होऊ लागला होता, त्यामुळे त्यांनी अनेक डॉक्टरांकडून त्यांनी इलाज करून घेतला. म्हणून डॉक्टरांच्या म्हणन्यांनुसार 1955 साली ‘प्राण साहेब’ आणि ‘मीनाकुमारी’ यांच्या बरोबर ‘आजाद’ की कॉमेडी फिल्म केली.
8) दिलीप कुमार यांचे पुरस्कार – Dilip Kumar’s award
दिलीप कुमार यांना पहिला व एकूण 8 असे सर्वात जास्त फिल्मफेयर अवॉर्ड मिळाले. तसेच यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार मिळालेले आहेत. दिलीप कुमार हे एकमेव भारतीय आहेत की ज्यांना पाकिस्तान सरकारने त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘निशाणी इम्तियाज’ हा प्रदान केलेला आहे.
हे पण वाचा – आर्ची हे काय केल ! Rinku Rajguru new Look Trolling !
9) अंध फकीराशी मैत्री –
दिदार पिक्चर मध्ये दिलीप कुमार यांना अंध व्यक्तीचा रोल करायचा होता, त्यासाठी त्यांनी मुंबईमध्ये एका अंध फकीराशी मैत्री करून त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यास सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की दिलीप कुमार यांनी सिनेमात केलेला अंध व्यक्तीचा रोल अजरामर झाला.
१०) पहिला रंगीत चित्रपट- The first color film
‘आन’ हा दिलीप कुमार यांचा पहिला रंगीत चित्रपट आहे.
हाच पिक्चर बघून सायरा बानू यांनी दिलीप कुमार यांच्यावर प्रेम करण्यास सुरुवात केली होती.