devmanus today full episode

devmanus today full episode
झी मराठी (zee Marathi) वरील लोकप्रिय मालिका देवमाणूस (devmanus) एका निर्णायक वळणावर पोचली आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

१) रेश्मा सापडली :-

त्यामुळे मालिकेत मोठमोठे खुलासे होताना दिसत आहे. वाड्यात एकामागून एक सांगाडे सापडत आहेत.या सर्वांमध्ये आता खेळता-खेळता खजिना सापडेल म्हणून टोण्या वाड्यामागील जमीन खाणन्यास सुरुवात करतो.

त्या दरम्यान त्याला सांगाड्याचा एक हात दिसतो. टोन्या घाबरून आरडाओरड करतो. त्यामुळे लोक जमा होतात ते पोलिसांना बोलवतात.

पोलीस तपास सुरू करतात. पोलिसांना सांगाड्या बरोबर एका स्त्रीचे कानातले सापडले आहेत.ते कानातले रेशमाचे आहे. रेश्मा ही पतपेढी चा मालक असलेल्या विजयची बायको आहे.पोलिसांनी ही खबर विजयला कळवली आहे. यावर डॉक्टरने अर्थात देवीसिंहनेच रेश्मा चा खून केल्या आहे असे विजय चे म्हणणे आहे.

Read More – Riteish Deshmukh and Genelia Deshmukh Viral Kissing Video

२) विजय ने केली आत्महत्या

रूपाच्या सांगड्यानंतर वाड्यात रेशमाचा देखील सांगाडा सापडला आहे. त्यामुळे रेशमाचा देखील खूण झाल्याचे उघड झाले आहे.

आत्तपर्यंत रेश्माचा पती विजय वणवण करत रेशमाचा शोध घेत होता परंतु वाड्यावर रेशमाचा सांगाडा सापडल्याने रेशमाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले.

devmanus
त्यामूळे विजय पुरता खचून गेला आहे. विजय दारू पिऊन बजा व नाम्याला भेटायला जातो.

त्यांना भेटून तो त्याच्याजवळ आपले मन मोकळे करतो. सर्वांना शेवटचे निरोप दिल्यासारखे बोलतो परंतु कुणाच्याही मनात विजय आपले काही बरे वाईट करेल असा विचार येत नाही.

विजय गावातल्या नदीवर जाऊन उडी घेऊन आपले आयुष्य संपवतो. या घटनांमुळे गावातील सर्वांना धक्का बसला आहे.

३) मालिका शेवटचा टप्पाकडे

मालिका लवकरच संपणार आहे त्यामुळे मालिकेत मोठमोठे खुलासे होणार आहेत. या सगळ्यात प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होताना दिसत आहे.

मालिकेचे नवीन प्रोमोमध्ये डॉक्टर अजित कुमार उर्फ देविसिंग स्वतः आपले सगळे गुन्हे कबूल करताना दिसत आहे.

त्याने स्वतःहून सगळे गुन्हे मान्य केल्याने आता त्याला कडक शिक्षा होणार आहे.

प्रोमोमध्ये देवीसिंगला फाशीच्या सूळा कडे नेले जात आहे. अर्थात या बोगस डॉक्टरला फासावर चढवून मालिकेचा शेवट होणार असल्याचे दिसते.

हे पण वाचा: रितेश देशमुख चे पहिले प्रेम जेनेलिया नाही, मग कोण?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय