नवी दिल्ली : राजधानी दिल्ली येथील एक अशी घटना समोर आली आहे. ज्यामुळे त्या परिसरात लोक चांगलेच हैराण झाले आहेत. घटना अशी आहे कि, राजधानी दिल्लीच्या (Delhi) नरेला परिसरात झालं असं की एका वृद्धाच्या मृत्यूनंतर लोक अंत्यसंस्काराची (Funeral) तयारी करत होते. मात्र, अंत्यसंस्कारापूर्वीच त्या वृद्धाने आपले डोळे उघडले! महत्वाची बाब म्हणजे हे तेव्हा घडलं, ज्यावेळी त्या वृद्धाचं शरीर अर्थीवरुन उचलून चितेवर ठेवण्याची तयारी सुरु होती. death old man suddenly breathed even opened his eyes
नरेलाच्या टिकरी खुर्द गावातील वय 62 वर्षीय नागरिक सतीश भारद्वाज यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या परिवारातील लोकांनी केला होता. वृद्धाच्या मृत्यूनंतर कुटुंबातील लोक शोकसागरात बुडाले होते. त्यानंतर त्या वृद्धाचे शरीर अंत्यसंस्कारासाठी स्मशान भूमीत नेण्यात आलं होतं.
मात्र, ज्यावेळी स्मशानभूमीत मुखाग्नी देण्यापूर्वी वृद्धाच्या चेहऱ्यावरील कपडा जेंव्हा बाजूला काढला तेंव्हा चक्क तो वृद्ध व्यक्ती जिवंत निघाला आणि श्वास घेऊ लागला. त्यामुळे सर्व लोक चांगलेच हैराण झाले. इतकंच नाही तर त्या व्यक्तीने डोळेही उघडले.death old man suddenly breathed even opened his eyes
डॉक्टरांकडून ती व्यक्ती जिवंत असल्याचे समोर आले.
दिल्ली येथील स्मशानभूमीत जमलेल्या नागरिकांनी तात्काळ पोलीस आणि रुग्णवाहिकेला फोन करुन याबाबत सविस्तर माहिती दिली.
तेथील स्माशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आलेल्या एका डॉक्टरनं त्यावेळी त्या वृद्ध माणसाची तपासणी केली.
तेंव्हा तो व्यक्ती जिवंत असल्याची समोर आले. तो वृद्ध व्यक्ती श्वास घेत आहे आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं पाहिजे असं डॉक्टरांनी त्यावेळी त्यांना सांगितलं.
त्यानंतर तेथेच उभा असलेल्या रुग्णवाहिकेतून त्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जाण्यात आले.
सश्मानभूमीवर अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेल्या लोकांपैकी दोघांनी पोलीस ठाण्यात फोन करुन याबाबत माहिती दिली होती त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण दुपारी 3 वाजताचा हा संपूर्ण प्रकार घडल्याचे दिसून आले आहे. त्या वृद्ध व्यक्तीचं नाव सतीश भारद्वाज आहे, त्यांचं वय साधारण 62 वर्षे इतके आहे.
हे पण वाचा: रितेश देशमुख चे पहिले प्रेम जेनेलिया नाही, मग कोण?
स्मशानभूमीतून थेट रुग्णालयात
त्या वृद्ध व्यक्तीने आपलं शरीर चितेवर ठेवण्यापूर्वी डोळे उघडले.
त्यानंतर त्यांचा रक्तदाब डॉक्टरांनी तपसला व हार्ट बीटसह सर्वकाही नॉर्मल असल्याचं पाहायला त्यांना मिळालं.
त्यानंतर स्मशानभूमीतूनच त्या व्यक्तीला रुग्णवाहिकेतून तातडीने राजा हरिश्चंद्र रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. तिथे त्यांच्यावर सध्या उपचार केले जात आहेत.
हा हैराण करणाऱ्या घटनेबाबत दिल्ली पोलीसांमधील सूत्रांनी सांगितलं की, तो वृद्ध व्यक्ती जिवंत होते.
तो व्यक्ती ज्या रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं, तिथे डॉक्टरांच्या सल्ल्याविना परिवारातील लोकांनी डिस्चार्ज घेतला होता.
रुग्णालयातून डिस्चार्ज घेताना डिस्चार्ड पेपरवर LAMA (left against medical advice) असं लिहिलं होतं. तसंच तो वृद्ध व्यक्ती कर्करोगाचा रुग्ण असून व्हेंटीलेटरचा खर्च जास्त होत असल्यानं परिवारातील लोक त्यांना रुग्णालयातून घरी घेऊन गेले होते.
Dia mirza new baby name लग्नाच्या 3 महिन्यातच दिया मिर्झाने दिला बाळाला जन्म
प्राथमिकदृष्ट्या रुग्णालयाचा हलगर्जीपणा
व्हेटिंलेटरवरुन काढल्यानंतर त्या व्यक्तीचा श्वास बंद झाला होता. त्यानंतर सकाळी 11 वाजता परिवारातील लोकांना त्यांचा मृत्यू झाला असं वाटलं आणि ते अंत्यसंस्कारासाठी त्या व्यक्तीला स्मशानभूमीत घेऊन गेले होते. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास सुरु आहे. यात प्राथमिकदृष्ट्या रुग्णालयाचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. death old man suddenly breathed even opened his eyes
“परंपरा विश्वासाची”
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com
🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡
⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !
या साईट ला सब्सस्क्राईब करा !
फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा