दशपर्णी अर्क

इंदापूर/ प्रतिंनिधी :-

मौजे बेडशिंगे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी श्री भाऊसाहेब रूपनवर व मंडळ कृषी अधिकारी श्री गणेश सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक १५ मे २०२१ पासून मका पिकाचे महिलांच्या शेतीशाळा आयोजन करण्यात येत आहे.दशपर्णी अर्क

सदर शेती शाळेमध्ये मका बियाणे निवड, माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन, बीजप्रक्रिया, रुंद वरंबा सरी पद्धत, निंबोळी अर्क प्रात्यक्षिक ,दशपर्णी अर्क प्रात्यक्षिक ,रासायनिक खतांचा वापर कमी करणे ,अमेरिकन लष्करी अळी नियंत्रण , कामगंध सापळे प्रात्यक्षिक याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे.

हे पण वाचा – घेवडा उत्पादकाने २० गुंठेत ६ लाख मिळवले, वाल लागवड माहिती, val lagwad mahiti

सदर मार्गदर्शनाचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. रासायनिक कीटकनाशकांचा अवाजवी वापर व त्याचा मानवी शरीरावर होणारा दुष्परिणाम लक्षात घेता शेताच्या बांधावरील कीटकनाशकांचे गुणधर्म असणाऱ्या वनस्पती पासून दशपर्णी अर्क बनवण्याचे प्रात्यक्षिक मंडळ कृषी अधिकारी सूर्यवंशी साहेब व कृषी सहाय्यक अनुपमा देवकर यांनी दाखविले.

दशपर्णी अर्क प्रात्यक्षिक
दशपर्णीअर्क प्रात्यक्षिक

यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. सदर शेती शाळेतील महिला इतर महिलांना दशपर्णी अर्क बनविण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत. या महिलांनी शेतीशाळेच्या प्रक्षेत्रावरती अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणासाठी कामगंध सापळे बसवलेले आहेत.

दशपर्णी अर्क बनविताना शेतीशाळेच्या महिला
दशपर्णीअर्क बनविताना शेतीशाळेच्या महिला

या शेतीशाळेमुळे आपल्याच शेताच्या बांधावरील वनस्पती या कीटकनाशक असतात याची आपल्याला माहिती मिळाली त्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून दशपर्णी अर्क वापरणार असल्याचे व विषमुक्त शेती करण्याचा आपला संकल्प असल्याचे उपस्थित महिलांनी सांगितले.

फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा

परंपरा विश्वासाची

🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !

📲7841913458

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक – आनंद पाटील

मुख्य संपादक  – ताम्रध्वज मनाळे.

संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय