किल्लारी प्रतिंनिधी :- पोलीस खात्यातील कर्तव्य बजावत असताना, पोलीस खात्यातील कर्तव्याबरोबरच, आपण समाजाचं काही देणं लागतो, या भावनेने केलेल्या समाजकार्याबद्दल मग ते लोकांना ऑक्सिजन बेड, प्लाजमा मिळवण्या पर्यंत ते लोकांचे लशीकरण केलेल्या या कार्याबद्दल, कोरोंना काळात उल्लेखनीय कामगारी केल्याबद्दल लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पिंगळे साहेब यांनी “कोविड योद्धा”म्हणून किल्लारी पोलिस स्टेशन चे पोलिस शिपाई श्री. आबासाहेब बापुराव इंगळे यांचा सन्मान केला.

श्री. आबासाहेब बापुराव इंगळे हे सरवडी, ता. निलंगा या गावचे सुपुत्र आहेत. आपल्या पोलीस सेवेतील कर्तव्याबरोबर समाजाच आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून नेहमी अनेकांना मदत करत असतात. कोरोना या सुक्ष्म विषाणूने जगात क्षरशः थैमान घातले. घडाळ्याच्या काट्यावर चालणारे हे जग जागेवर थांबले अश्या घातक, भयंकर जीवघेण्या, संसर्गजन्य कोरोना रोगाचा सामना करण्यासाठी देशात काही कोरोना योद्धे समोर आले.
या संकटामुळे एकीकडे आपले जवळचे लोकच स्वतःच्या जिवाच्या भीतीने लांब जात असताना दुसरीकडे इंगळे सारखे योद्धे आपल्या जिवाची परवा नं करता अनेकांना मदत करत आपल्या गावासह जिल्यातील अनेक लोकांना आबा इंगळे याने हॉस्पिटल, बेड, ऑक्सिजन असेल प्रसंगी त्यांना आर्थिक मदत असेल अश्या अनेक प्रकारची मदत करून अनेकांचा जणू देवदूतचं बनला, त्यामुळे अनेकांचा आशिर्वाद मिळाला व कौतुकाची थापही मिळाली त्याचाच भाग म्हणून मा. जिल्हा पोलिस अधिक्षक पिंगळे साहेब यांच्या हस्ते आज ग्रामीण रुग्णालय किल्लारी व कै. शांताबाई बाबुराव बिराजदार यांच्या स्मरणार्थ कोविड योध्या म्हणून सन्मान केला आहे.
“परंपरा विश्वासाची”
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com
🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡
⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !
📲7841913458