लातूर :- आज सर्व शेतकरी लवकर उत्पन्न देणर्या पिकाची लागवड करतात. परंतु आज चंदनाची शेती कमी प्रमाणात केली जाते. पण जर चंदन शेती केली तर आपण एक एकरात करोडेचे उत्पन्न काढू शकता. कसे ते सविस्तर वाचा. (Chandan sheti kashi karavi sampurn mahiti ?)
चंदन शेती संपूर्ण माहिती –
मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातही काही ठिकाणी चंदनाचे झाडे दिसतात पण त्याची झाडे फार कमी प्रमाणात दिसतात जर कोणी अशा प्रकारची शेती केली तर आपणास श्रीमंत होण्यापासून कोणाही रोकू शकत नाही. चंदन चोरी होत असल्या कारणाने शेती केली जात नाही. पण मित्रांनो जे पीक चोरी होत तेच केल पाहिजे, आणि आपण जे पीक चोर नेत नाही ते केल्याने आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली.
मित्रांनो जागे व्हा स्मार्ट शेती करा आणि आपल्या आयुष्याचे कल्याण करा. आज आम्ही आपल्या या प्रगतशील शेतकरी वाचकांसाठी अतिशय सोप्या भाषेत चंदन शेती कशी करावी ? चंदन शेती ची संपूर्ण माहिती ? सविस्तर जाणून घेणार आहोत.
एक चंदनाचं झाड काही लाख किमंतीच !
चंदनाचं(Sandalwood) झाड खूप महागडं असतं हे कदाचित तुम्हाला पण माहिती आहे. चंदनाचा वापर आपणास माहीत आहे कित्येक ठिकाणी केला जातो, जसे अत्तर बनवणे, अग्नि होम हवन, देव पुजेत करतात. पण चंदनाची शेती केली जाते हे फार कमी जणांना माहिती असेल. कारण देशातल्या फार कमी भागात चंदनाची शेती केली जाते. तुम्ही एक झाड जरी चंदनाचं लावलं तर कमीत कमी त्याची किंमत 5 लाख रुपये एवढी आहे. मग विचार करा जर तुम्ही 500 झाडे लावलीत तर किती होतील. तुम्हीच करून बघा, बघा परत एकदा आकडा चुकला असेल .
सध्या चंदनाची शेती कुठे करतात ?
हरयानात घरोंडा नावाचं गाव आहे. तिथं एक शेतकरी चंदनाची शेती करतो. त्यांनी काही एकरावर चंदनाची झाडं लावलेली आहेत आणि ते आता चांगले वाढताना दिसतायत. चंदनाचं रोपटं लावलं तर त्याचं साधारण झाड होणेसाठी 12 वर्षेचा कालावधी लागतो. एक रोप पाच ते सहा लाख रुपयांची निश्चित आहे. घरोंड्याच्या शेतकऱ्यानं तर एका एकरात 600 चंदनाची रोपटी लावलेली आहेत त्याला आता पाच वर्ष झाली आहेत. म्हणजे आणखी 7 वर्षानं त्यांना किती कोटी रुपयांची कमाई होईल तुम्हीच गुणकार करून बघा. आपल्याकडे तर महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भाला निसर्गाची देणगी आहे हे आपणाला माहीतच नाही. मग करा विचार आणि लावा एक एक्कर चंदन शेती.
चंदनाच्या रोपट्याची किंमत किती आहे ?
चंदनाची किमंत जास्त आहे म्हणून रोपटं सुद्धा थोड महाग मिळतं. म्हणजे त्याची जशी कमाई आहे तशीच त्याच्या रोपट्याची किंमत आहे. एका रोपासाठी 500 ते 600 रुपये मोजावे लागतात. महाराष्ट्रात गेल्या काही काळात याचं बियाणं सुद्धा मिळतं. सरकारनेही चंदनाच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केलेले आहे. चंदनाची शेती आंध्र, (Andhra) कर्नाटकमध्ये(Karnatak) मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात बियाणेही पूर्वी कर्नाटकातून यायचं आता मात्र ते महाराष्ट्रातही उपलब्ध होतं.
चंदनाची लागवड कशी होते?
आता आपण मूळ मुद्द्याला हात घालू, चंदनाला सोन्यापेक्षा जास्त किंमत आहे कारण तो सर्वच बाबतीत दुर्मिळ आहे. म्हणजे शंभर बिया पेरल्या तर त्यातल्या दहा ते पंधरा टक्के किंवा जास्तीत जास्त 20 टक्के येतात.
एखाद्या किलो बियाण्यांपासून दोनशे ते अडीचशे रोपं तयार होतात. जून महिना लागवडीसाठी योग्य आहे. पेरलेलं उगवायला जवळपास दोन महिने लागतात. उगवल्यानंतर पंधरा दिवसानंतर पिशवीत ठेवलं जातं. दोन वर्षे चंदनाच्या रोपट्याची वाढ पिशवीतच होते. पण दोन वर्षात पिशवी काही वेळा बदलली जाते. पाच ते सहा वर्षात झाडाची उंची बारा ते पंधरा फूट एवढी अपेक्षीत आहे. ज्या खड्यात चंदन लावलेलं आहे तो माती आणि शेणखतानं भरलेला असतो. विशेष म्हणजे चंदन सर्व प्रकारच्या मातीत उगवतं. तग धरतं.
चंदनाला कशापासून धोका आहे ?
साहजिक हे झाड महाग असल्याने चोरापसून जास्त प्रमाणात धोका आहे. चंदनाच्या झाडावर साप असतात अशी धारणा खुप काळापासून आहे पण त्यात तथ्य नाही. चंदनाची चोरी करु नये म्हणून ही धारण पसरवली गेली आहे. चंदनाला खरा धोका आहे तो पाण्यापासून आणि चोरपासुन. त्याला फार जास्त पाणी चालत नाही. खोलगट भागात जिथं पाणी साचतं तिथं चंदनाची लागवड करता येत नाही. जास्त पाण्यात त्याचं झाड सडण्याची शक्यता जास्त आहे.
हे वाचा- OMG! 2 लाख 70 हजार प्रती किलो आंबे ! जगातील सर्वात महाग आंबा ? सविस्तर माहिती जाणून घ्या!
चंदन शेतीवर सरकारचं धोरण काय आहे?
चंदनाची शेती कुणीही करु शकतं गरीब शेतकरी सुद्धा करू शकतो, पण त्याची निर्यात मात्र शेतकरी करु शकत नाही. कुठल्या कंपन्यांनाही त्याची निर्यातबंदी आहे. याचाच अर्थ फक्त सरकारच चंदनाची निर्यात करु शकते. चंदनाचं झाड तयार झालं की वनविभागाला तशी माहिती द्यावी लागते. त्यांची परवानगी घेऊन करा. त्यानंतरच निर्यातीचं काम केलं जातं. चंदन जगातलं सर्वात महागडं झाड आहे. सध्या प्रती किलो 27 हजार रुपये त्याची किंमत आहे. एका झाडापासून 15 ते 20 किलो चंदनाचं लाकुड मिळतं, ज्याची किंमत 5 ते 6 लाख रुपये एवढी होते. सुगंधी तेलापासून ते आयुर्वेदिक औषधं आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये चंदनाचा वापर केला जातो. म्हणूनच त्याला जास्त किंमत आहे.
चंदन वेगाने वाढतो-
अडीच वर्षाच्या चंदनाच्या रोपट्याला लावणं उपयोगाचं मानलं जातं. तोपर्यंत तो दोन ते अडीच फूट वाढलेला असतो. थंडीच्या दिवसात चंदनाची लागवड करु नये. आठवड्यातून त्याला फक्त दोन ते तीन लीटर पाणी लागतं. पाणी जेवढं नियंत्रीत ठेवाल तेवढं त्याला फायदेशीर. काही जण चंदनाला परजीवी मानतात त्यामुळे सोबत कुठलं तरी पिक घेण्याचा सल्ला दिला जातो. पण विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार चंदन अर्धपरजीवी आहे. त्यामुळे तज्ञांचा सल्ला यात उपयुक्त ठरतो.
चंदनाची मिश्र शेती केली जाते का ?
हो, चंदनाच्या शेता मध्ये इतर पिकही घेता येतात. चंदनाच्या दोन झाडात 20 फुटाचं अंतर ठेवावं लागत आणि मग त्यात इतर पिकं सुद्धा घेऊन फायदा घेता येतो. हे विशेष आहे. फक्त त्यात जास्त पाण्याचे पिके घेता येत नाहीत जसे ऊस किंवा तांदुळ लावता येत नाही.
लाल आणि पांढरं चंदन काय आहे ?
आपणास माहीत नसेल चंदनाचं झाड हे हळूहळू पकतं. याचाच अर्थ चंदन असा कि, जेंव्हा चंदन वयात येतो तसा त्यात सुंगध भरतो. सुंगध येतोय म्हणजे त्याचं वजनही वाढलेल असत. चंदनाचं झाड जेवढा काळ ठेवाल तेवढा त्याच्या वजनात भरतं. दोन प्रकारची चंदनाची झाडे असतात. एक लाल चंदन आणि दुसरं पांढरं चंदन. आपल्याकडे पांढऱ्या चंदनाचीच शेती केली जाते. कारण आपल्याकडची जमीन त्यासाठी अनुकूल आहे. हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेशात पांढऱ्या चंदनाचीच शेती केली जाते. 5 ते 47 डिग्री तापमानात चंदन व्यवस्थित येतो.
चंदन शेती करोडोचे उत्पन्न.! सत्य की अफवा ? हे सविस्तर खालील व्हिडिओ मधून जाणून घ्या, चंदन शेती विषयी आपल्या मनात असलेल्या प्रत्येक प्रश्नांची सविस्तर उत्तरे उत्तर दिलेले आहे. अशा प्रकारची शेती केली तर शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यामुळे हि माहीत आपल्या शेतकरी बांधवापर्यन्त नक्की शेयर करून पोहचवा.
चंदन शेतीची संपूर्ण माहिती पहा –
“परंपरा विश्वासाची”
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com
🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡
⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !
📲7841913458