इंदापूर /प्रतिंनिधी दि.30/12/2021 Bhima Koregaon
भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व वाहनांना टोल फ्री करण्यात यावा – संजय सोनवणे
पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने आज सरडेवाडी टोल प्लाझा येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मा.संजय भैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तालुका संघटक मा.अंगद गायकवाड,युवक अध्यक्ष मा.तुषार भोसले, उपाध्यक्ष मा.सोनुभाऊ ढावरे,शहर कार्याध्यक्ष मा.अवि चौगुले,मा.अतुल चव्हाण व इतर पदाधिकारी यांनी सरडेवाडी टोल प्लाझा चे मॅनेजर मा.शिदे साहेब,मा.उदावंत साहेब,प्लाझा चे अॅँडव्होकेट सरवदे साहेब यांची भेट घेऊन 1 जानेवारी शौर्य दिनाच्या निमित्ताने भिमा कोरेगांव येथे शुरविरांना अभिवादन करण्यासाठी सोलापूर विभागाकडून कर्नाटक राज्यातील भिमा कोरेगांव कडे येणाऱ्या सर्व भिमसैनिकांच्या फोर व्हिलर पासुन बस वगैरे सर्व गाड्या सरडेवाडी आणि पाटस टोल वरून फ्री सोडण्यात याव्यात. यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने निवेदन देण्यात आले. टोल प्रशासना सोबत चर्चा केली असता यावेळी टोल प्लाझा प्रशासनाने त्यांचा मागण्यांचा विचार केला व सहकार्य करण्याचे मान्य केले.
टोल प्लाझावर फ्री मध्ये जाण्यासाठी काय करावे लागेल :- Bhima Koregaon
दि.31/12/2021 रोजी मध्यंरात्री पासुन ते 2/1/2021.दुपारी 12 वाजेपर्यंत भिमसैनिकांच्या ज्या गाड्यांना निळा झेंडा किंवा गाडीवरती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा स्टीकर किंवा बॅनर लावलेला असेल त्या गाड्या जाताना येताना फ्री मध्ये सोडल्या जातील.
टिप. ( 1 )सरडेवाडी टोल प्लाझा मधून पुण्याकडे जातांना लेंथ नं. 1 / 2 मधून जायचं आहे आणि भिमा कोरेगांव येथुन सोलापूर कडे माघारी येताना लेंन नं. 11 / 12 मधून जायचं आहे. त्या ठिकाणी जास्त गर्दी झालेली असेल तर कोणत्याही लेंन मधून गेले तरी चालेल फक्त टोल प्लाझा कर्मचाऱ्यांना आपण भिमा कोरेगांव ला कार्यक्रमासाठी चाललेलो आहे हे सांगणं आवश्यक आहे आणि गाडीला निळा झेंडा असन हे पण आवश्यक आहे .
(2) पाटस टोल प्लाझा येथून पुण्याच्या दिशेने जाताना सर्व भिमसैनिकांनी लेंन.नं.1/2 मधून जायचं आहे तसेच भिमा कोरेगांव येथुन सोलापूर दिशेने माघारी येताना लेंन.नं. 13/14 मधून यायचं आहे प्रत्येक गाडीला निळा झेंडा लावण आवश्यक आहे ज्यांना झेंडा नाही त्यांनी स्टीकर लावणं आवश्यक आहे .
टोल प्लाझा प्रशासनाने सहकार्याची भूमिका घेतल्या बद्दल त्यांचे सर्व भिम सैनिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
जर कुणाला पुणे ते सोलापूर दरम्यान कुणालाही कसलीही अडचण असेल तर त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
मा.संजय ( भैय्या) सोनवणे.
अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र
पीपल्स रिपब्लिकन पार्टी
मो.9975517000
Ujani Dam information in marathi – मला वाचवा ! तुमचाच यशवंतसागर जलाशय ! उजनी धरण !!
“परंपरा विश्वासाची”
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com