Best CNG Car कार घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. तसेच कार ची किमंत ग्राहकांना स्वस्त पाहिजे आणि कार मायलेजपण चांगले पाहिजे. वाढत्या पेट्रोल दर पाहता लोकांची पसंती CNG कारकडे असल्याचे दिसत आहे. भारतीय बाजारपेठेतील इतर कंपन्यांशी मारुती सुझुकीची तुलना होऊ शकत नाही. अनेक दशकांपासून, मारुती सुझुकी देशांतर्गत बाजारात स्वस्त आणि सर्वोत्तम मायलेज कारसाठी ओळखली जाते. तसेच ग्राहकांसाठी स्वस्त आणि जास्त मायलेज ची कार याच मारुती सुझुकी कंपनीने बाजारपेठेत आणिली आहे.
मारुती अल्टो Maruti Alto ही बर्याच काळापासून सर्वाधिक विकली जाणारी कार आहे, परंतु मे महिन्यात कंपनीची टोल बॉय म्हणून प्रसिद्ध असलेली वॅगन आर (wagon r) ही सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली होती.
Best CNG Car Maruti Suzuki WagonR
मित्रानो Best CNG Car Maruti Suzuki WagonR ने मे २०२२ महिन्यात 16,814 कार वाहनांची विक्री केलेली आहे, ज्यामुळे ती मे 2022 मध्ये भारतात सर्वाधिक विकली जाणारी कार बनली आहे. मारुती सुझुकी वॅगन आर या कार ची Maruti Suzuki WagonR किमंत 5.55 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 7.08 लाख रुपयांपर्यंत जाते. म्हणजे बेसिक मॉडेल ऑन रोड आपणास 5.75 लाख रुपया पर्यंत पडेल. टोप मॉडेल आपणास 7.12 लाख रुपयांपर्यंत जाते.
मित्रानो दुसरीकडे, जर आपण मारुती अल्टो कार बद्दल बोललो तर मे महिन्यात या कारचे फक्त 12933 कार विकले गेले आहेत. हळू हळू या कार चा सेल कमी होत आहे. मारुती अल्टोची किंमत 3.42 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 5.10 लाख रुपयांपर्यंत जाते.
मारुती वॅगनआर आणि अल्टो कार या दोन गाड्यांची किमंत पहिली तर थोडा फार फरक आहे. WagonR कार हि मार्केट मध्ये पेट्रोल इंजिन आणि सीएनजी या प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. टोल-बॉय बॉक्सी डिझाइनमुळे, या कारला केबिन आणि लेगरूममध्ये देखील चांगली जागा मिळते. कार दोन वेगवेगळ्या पेट्रोल इंजिनसह येते. सविस्तर आपण खालील तक्त्या मध्ये पाहू.
पेट्रोल इंजिन 1.0-लिटर | 68PS/90Nm |
पेट्रोल इंजिन 1.2-लीटर | 83PS/113Nm |
CNG प्रकारात 1.0-लिटर इंजिन | 60PS पॉवर आणि 78Nm टॉर्क जनरेट करते |
- कार 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते.
- अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले
- मॅन्युअल एसी
- पॉवर विंडो
- कीलेस एंट्री आणि स्टीयरिंग-माउंट ऑडिओ आणि कॉलिंग कंट्रोल्ससह 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते.
- मारुती वॅगन आरमध्येही सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे.