बीड प्रतिनिधी – नवनाथ आडे – बीडमध्ये घरकूल मंजुरीसह त्याचे हफ्ते देण्यात यावेत या मागणीसाठी कुटुंबियांसह उपोषणास बसलेल्या उपोषणार्थीचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (४ डिसेंबर) सकाळी घडली. दरम्यान दोन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. प्रकृती खालावल्यानंतरही उपचार घेण्यास नकार दिल्यानंतर हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. Beed today News

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविवारी (४ डिसेंबर) उपोषणार्थी अप्पाराव भुजंग पवार (वय ५८, रा. वासनवाडी ता.बीड ) यांचा उपोषणस्थळीच मृत्यू झाला. वासनवाडी शिवारातील जागेत हक्काच्या घरकुल मंजुरीसह थकीत हफ्ते तात्काळ देण्यात यावेत या मागणीसाठी पवार कुटुंबाने दि.2 डिसेंबर रोजी प्रशासनाला निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबियांसह बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र प्रशासनाने निवेदन स्विकारण्यापलीकडे काहीच केले नाही. त्यामुळे दोन दिवसांपासून उपोषण सुरूच होते. Beed today News

प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे बळी गेल्याचा आरोप

रविवारी सायंकाळी उपोषणार्थी अप्पाराव भुजंग यांची प्रकृती खालावली मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. त्यातच रात्रभर कडाक्याच्या थंडीमुळे आज सकाळी अप्पाराव पवार यांचा मृत्यू झाला. सदरील प्रकार लक्षात येताच पवार कुटुंबीयांनी उपोषणस्थळीच टाहो फोडला. मृतदेहाभोवती गराडा घालुन बसलेल्या कुटुंबीयांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. यापूर्वीही घरकुल मागणीसाठी अनेकवेळा उपोषणे केली. तरीही न्याय मिळाला नाही मात्र आज त्याच न्याय हक्काची मागणी करत असताना कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे बळी गेल्याचा आरोप कुटुंबियांनी केला.

न्यायासाठी लढत असताना नातवानंतर आता पतीचा उपोषणस्थळीच मृत्यू

बीड तालुक्यातील वासनवाडी शिवारात पवार कुटुंब ३५ वर्षांपासून राहत आहे. २०२० साली त्यांना घरकुल मंजूर झाले. बांधकामासाठी पहिला हफ्ता देखील मिळाला मात्र त्यानंतरचे हफ्ते थकीत आहेत. शासनाने जागेचा पिटीआर दिला तशीही स्थानिक यंत्रणेने काम थांबविले. न्याय मिळावा म्हणून प्रशासन दरबारी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. यापूर्वी उपोषणस्थळीच सुनेची प्रसूती झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू असतांना नातवाचा डेंग्युमुळे तर आज पतीचा मृत्यू झाला तरीही न्याय मिळावा नसल्याचे कविता पवार यांनी सांगितले.

Beed today News

शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात? किडनीचा आजार रोखण्यासाठी बुलढाण्यात अनेक गावात उभारलेले फिल्टर 7 वर्ष झाले तरी बंदच

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय