बीड: केज तालुक्यातील पैठण सावळेश्वर येथे शेतातील पाणी साठवण्यासाठी बांधण्यात आलेल्या हौदात बुडून तीन बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान पैठण शिवारात घडली होती. या घटनेबद्दल समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
चिमुकल्यांचे मृतदेह पाहून गावकऱ्यांनीदेखील हंबरडा फोडला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.केजपासून १५ किमी अंतरावर असलेल्या पैठण सावळेश्वर येथील चुलत्याच्या शेतातील ज्वारी काढण्यासाठी तीनही बालकांच्या आई गेल्या होत्या. दुपारचे जेवण केल्यानंतर या तीनही बालकांना तेथून जवळच असलेल्या झाडाखाली थांबवून सर्वजण ज्वारी काढण्यात व्यस्त झाले.
हे पण वाचा :- कमी भांडवलामध्ये हे व्यवसाय करा आणि मालामाल व्हा ?
घटनेची माहिती मिळताच युसूफवडगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, एएसआय डोईफोडे, जमादार म्हेत्रे व घोरपडे यांनी घटनास्थळी जाऊन तीनही बालकांचे मृतदेह हौदाबाहेर काढून बनसारोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून पैठण गावावर शोककळा पसरली आहे.