बीड प्रतिनिधी- नवनाथ आडे

AC – बीड तालुक्यातील मौजे. बेलगाव येथील बेलेश्वर मंदिरातुन दि.२० सप्टेंबर रोजी चोरीला गेलेला पंचधातुचा मुकुट सापडला असून आज दिनांक.१ डिसेंबर गुरूवार रोजी नेकनुर पोलीस स्टेशन प्रभारी एपीआय विलास हजारे,उपनिरीक्षक विलास जाधव यांच्या हस्ते बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.महादेव भारती महाराज,ह.भ.प.तुकाराम भारती महाराज यांना सुपुर्त करण्यात आला यावेळी नेकनुर पोलीस प्रशासनातील आधिकारी,कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर उपस्थित होते.

सविस्तर माहीतीस्तव
__
मौजे. बेलगाव ता.जि.बीड येथील सुप्रसिद्ध बेलेश्वर मंदिरातील पंचधातुचा मुकुट व शेषनागाची मुर्ती आदि गाभाऱ्यातील साहित्य दि.२० सप्टेंबर रोजी पहाटे मंदिराचे कुलुप तोडून चोरट्यांनी पळवल्याची तक्रार फिर्यादी नामे महादेव भारती गुरू संतराम भारती यांनी नेकनुर पोलीस स्टेशन येथे गुरन.२१७/२०२२ कलम ३८० ,४५७ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

अपर अधिक्षक कविता नेरकर ,उपअधिक्षक संतोष वाळके घटना स्थळी भेट
__
बेलेश्वर मंदिरातील पंचधातुंच्या मुर्ती चोरी प्रकरणात पोलीस प्रशासनातील वरिष्ठ आधिकारी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तसेच उपअधिक्षक संतोष वाळके यांनी ताबडतोब घटनास्थळी पाहणी करून घटनेच्या रात्रीतील डम डाटा गोळ् करण्याचे आदेश तपास आधिकारी नेकनुर पोलीस स्टेशन सपोनि शेख मुस्तफा,उपनिरीक्षक विलास जाधव यांना दिले होते .

खोडसाळपणातुन घटना घडली असावी बेलेश्वर बाबांचे महात्म्य अगाध आहे:- ह.भ.प.महादेव भारती महाराज
_
बेलेश्वर मंदिरातुन मुर्तीची चोरी जाण्याची घटना प्रथमच घडली असून बेलेश्वरचे महात्म्य अगाध असुन पंचक्रोशीतील भाविकांची श्रद्धा असून कोणीतरी खोडसाळपणातुन हा प्रकार केला असावा अशी शंका अगोदरच बोलुन दाखवली होती.मंदिराच्या पाठीमागील डोहामध्ये पाणी ओसरल्यानंतर एका शेतक-याच्या दृष्टीस पडल्यानंतर पोलीस पंचनामा करून जप्त करण्यात आलेली मुर्ती आज आमच्या स्वाधीन करण्यात आली.

पोलीस प्रशासनातील आधिका-यांचे भाविकांकडून आभार
_
२० सप्टेंबर रोजी बेलेश्वर मंदिरातुन मुर्ती चोरी प्रकरणात पोलीस वरीष्ठ प्रशासनातील आधिका-यांनी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तसेच उपअधिक्षक संतोष वाळके यांनी त्याच दिवशी घटनास्थळी पाहणी करत चौकशीचे आदेश दिले होते त्याचबरोबर नेकनुर पोलीस स्टेशन एपीआय शेख मुस्तफा ,उपनिरीक्षक विलास जाधव तसेच तसेच लिंबागणेश पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार निकाळजे,पोहे.डिडुळ,राऊत,यांच्या टीमने सर्च ऑपरेशन करत सर्वबाजुंनी तपासाची चक्रे फिरवत प्रयत्नांची पराकाष्ठा करत शोधमोहीम राबवली होती त्याबद्दल भाविकांनी त्यांच्या कौतुकास्पद कामगिरी बद्दल अभिनंदन करून आभार मानले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय