bareilly hotel death news माणसाला मृत्यू कधी व कसा येईल हे कोणालाही सांगता येत नाही. परंतु समाजात कधीतरी असे काही प्रसंग घडतात की त्यावर विचार करणे भाग पडते.असाच एक प्रकार बरेली मध्ये घडलाआहे. एक प्रभात नावाचा तरुण वाढदिवसाच्या पार्टीत डान्स फ्लोअर वर आनंदाने डान्स करत होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलाही थकवा अगर वेदना नव्हत्या, होते ते फक्त हसू आणि आनंद.

सुमारे एक मिनिटे २४ सेकंद नाचला आणि पुढील एका सेकंदानंतर तो खाली वाकला आणि धड़कन जमिनीवर खाली पडला. तेथेच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे सांगत आहेत .डान्स करताना त्याला हृदयविकाराची कोणतीही लक्षणे जाणवत नसल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. तरुणाच्या चेहऱ्यावर डान्स करताना कसली भीती वेदना दिसत नाहीये ,दिसतो तो केवळ आनंद. व्हिडिओमध्ये डान्स करताना तो गुडघ्यापर्यंत वाकला व अचानक खाली पडला व तेथेच त्याचा मृत्यू झाला.

होय केंद्र सरकार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेणार आहे.

गुरुवारी रात्री मानव सेवा क्लबचे सदस्य विशाल मेहता यांची बरेली येथे हॉटेल ग्रँड मध्ये वाढदिवसाची पार्टी होती. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटर्नरी मेडिकल अँड रिसर्च ॲनिमल जेनेटिक्स विभागात काम करणारे तांत्रिक सहाय्यक प्रभात कुमार उर्फ प्रेमी हे देखील या पार्टीत सहभागी होण्यासाठी गेले होते. तिथे ते ,एक लडकी चाहिए खास खास ,या लोकप्रिय गाण्यावर नृत्य करत होते .

सुमारे अर्धा मिनिट हसत हसत ते नाचत होते व नंतर अचानक ते जमिनीवर कोसळले. कार्यक्रमाला उपस्थित असलेले विनोद पगरानी यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रभातच्या शरीरात कोणतीही हालचाल झाली नाही .

त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यासंदर्भात डॉक्टर पगराणी यांनी सांगितले की हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे हृदय पूर्ण पणे निकामी झाले होते, त्यामुळे त्यांना वाचवण्यात आम्हाला यश आले नाही.

प्रभात यांच्या निधनाचे वृत्त समजतात आय व्ही आर आय कॅम्पस मधील शास्त्रज्ञ आणि इतर अधिकारी व कर्मचारी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पार्थिवावर मॉडेल टाउन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभात कुमार हे त्यांच्या ओळखीच्या लोकांमध्ये प्रेमी या टोपण नावाने प्रसिद्ध होते . त्यांच्या साथीदारांनी त्यांच्या स्वभावावरून त्यांना प्रेमी हे टोपण नाव दिले होते. प्रभात यांचा स्वभाव अतिशय मौजी व सर्वांना सहकार्य करणार होता.

या घोषणेनंतर, महागाई भत्ता 39 टक्के वाढेल, जो सध्या 34 टक्के मिळत आहे.

शहरातील जेष्ठ हृदयरोग तज्ञ डॉक्टर मनाजीर  इकबाल यांनी सांगितले की रुग्णाला करोनरी ऑर्डरी डिसीज झाला असावा. त्याच्या धमन्या 90 ते 95 टक्के बंद झाल्या असतील त्यामुळे त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर मनाजीर यांनी सांगितले की नृत्य देखील एक व्यायाम आहे. bareilly hotel death news

नाचताना त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले असावेत कदाचित त्यावेळी त्यांनी अन्न देखील खाल्लं असेल. नृत्याचा व्यायाम थकवणारा  असतो. नाचताना त्यांना छातीत दुखू लागलं असल्याची शक्यता वर्तवली जात असून त्यांनी या दुखण्याकडे दुर्लक्ष केल्याची शक्यता आहे.

VIDEO : मेरी शादी करवाओ! तरुणामागे पळत सुटली तरुणी; लग्नासाठी भररस्त्यात ड्रामा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय