आज कालठण नंबर 1 येथे विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती आधार युथ फाऊंडेशन व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. babasaheb ambedkar jayanti

➡ ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यावेळी सामुदायिक वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माजी उपसरपंच सचिन काका जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देत जयंती साजरी करण्यासाठी कोणत्याही आमंत्रणाची गरज नसते हे तर आपले कर्तव्य (सामाजिक बांधिलकी) आहे. असे समजून उपस्थित राहायचे असते.

कारण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अखंड देशाला संविधानाच्या माध्यमातून एकसंघ ठेवण्याचे काम केले आहे. त्यांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा मूलमंत्र दिला आहे. त्यानुसार काम करून आदर्श गाव निर्माण करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.

babasaheb ambedkar jayanti
babasaheb ambedkar jayanti

यावेळी कालठण विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन किसन बापू जावळे, माजी उपसरपंच देविदास पाटील, हरिदास पाटील, अरुण उर्फ राजेंद्र पाटील,सोसायटीचे माजी चेअरमन विजय जेडगे, शिवसेना नेते शामराव लावंड, तुषार भाऊ घाडगे, हर्षल पाडुळे, अरुण काळे (टेलर मामा), वैभव गटकुळ, ऋतुराज गटकुळ, दिलीप लोंढे, अनिल पाडुळे, तेजस पांडुळे, सहदेव जगताप, नंदु जगताप मंडळाचे मार्गदर्शक माजी पोलीस किंचक जगताप साहेब, सुधाकर चव्हाण, सोसायटीचे माजी संचालक मधुकर चव्हाण,सोसायटीचे संचालक मुरलीधर चव्हाण, हरिदास चव्हाण, शामराव चव्हाण,सिद्धार्थ साळवे,सुरेश चव्हाण, विनोद चव्हाण, प्रवीण ओव्हाळ, किसन भैलुमे, समीर मखरे,दत्तात्रय लोंढे,अक्षय कदम, प्रमोद भाऊ चव्हाण,समाधान चव्हाण,तुषार चव्हाण, कुमार चव्हाण, यशराज चव्हाण,आदेश चव्हाण,आनंद साळवे,अक्षय शिंदे इत्यादी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रमोद भाऊ चव्हाण तर आभार मंडळाचे मार्गदर्शक विनोद चव्हाण यांनी मानले.

आमच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हा

क्लिक करा 

हे पण वाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय