amreavati news

अमरावती (Amravati News) जिल्ह्यात बैलपोळ्याच्या दिवशी काळीज हेलावून टाकणारी एक घटना घडलीय. आजोबांसोबत फुगे घेण्यासाठी गेलेल्या 2 वर्षांच्या चिमुकलीवर काळानं घाला घातलाय. हवेत उडणारा फुगा पाहून ही मुलगी आपल्या आजोबांना घेऊन फुगा घेण्यासाठी गेली. पण गॅसचा फुगा (Gas Balloon) घेण्यासाठी गेली असता, अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात दोन वर्षांच्या चिमुकलीचा जीव गेला. ही हृदयद्रावक घटना अमरावती जिल्ह्यामध्ये घडली. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर (Achalpur) तालुक्यातील शिंदी बुद्रूकमध्ये घडलेल्या या घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय. परी सागर रोही असं दोन वर्षांच्या या चिमुकलीचं नाव आहे. गॅस सिलिंडरच्या स्फोटात झालेल्या मृत्यूने परीच्या आई वडिलांसह इतर नातलगांनाही मोठा धक्का बसलाय. या घटनेमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडालंय. गावातील पोळ्याच्या जत्रेदरम्यानच ही धक्कादायक घटना घडली. त्यामुळे पोळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जत्रेच्या आनंदाला गालबोट लागलं.

परी सागर रोही ही दोन वर्षांची मुलगी आपल्या आजोबांसोबत तान्हा पोळ्याच्या यात्रेला गेली होती. या यात्रेत उडणारा फुगा बघून ती आपल्या आजोबांना सोबत घेऊन फुगेविक्रेत्याच्या जवळ पोहोचली. त्याच दरम्यान, फुगे विक्रेत्या जवळील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला आणि परी गंभीररीत्या जखमी झाली. तिची जखम इतकी मोठी होती की दोन वर्षांच्या चिमुकलीचा पाय शरीरापासून वेगळा झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय