लातूर जिल्हा प्रतिनिधी- विशाल मुंडे

दि.16 लातूरचे पालकमंत्री मा श्री अमित विलासराव देशमुख यांची बाभळगाव येथे भेट घेऊन औसा मतदारसंघात औसाचे आमदार श्री. अभिमन्यू पवार हे राबवत असलेल्या शेत तिथे रस्ता, हरित शिवरस्ते व मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानाबाबत सविस्तर चर्चा करून हरित क्रांतीचे प्रणेते स्व वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीदिनी नियोजित “शेतरस्ते लोकार्पण व हरित शिवरस्ते कार्यान्वयन” सोहळ्यास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याचे त्यांना निमंत्रण दिले.

या भेटीत त्यांनी खालील विषयांसंदर्भात चर्चा केली:

1.१९९३ च्या महाप्रलयकारी भूकंपात घरांची पडझड झाल्याने अनेक कुटुंबे गायरान व गावरान जमिनीवर तात्पुरत्या स्वरूपाची घरे बांधून राहवू लागली. या घरांना वीज, पाणी व रस्ता अशा सुविधा देण्यात आल्या पण घरे नावावर नसल्याने बँक कर्ज, आवास योजना व इतर शासकीय योजनांचे लाभ मिळू शकत नाहीत. शासन आदेशाप्रमाणे २०११ पूर्वीची घरे नियमित करण्यासाठी पंचायत समितीने प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केला आहे. जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन सदरील घरे नियमित करण्यास मान्यता देऊन ८-अ वितरित करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी.

2. १९९३ च्या भूकंपात कारला व कुमठा या गावांमध्ये जीवितहानी न झाल्याने या गावांचे पुनर्वसन झालेले नाही. शासन नियोक्त तज्ञ समितीने या गावांचे सर्वेक्षण करून गावातील घरे राहण्यासाठी धोकादायक असल्याचा अहवाल शासनास सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी दोन्ही गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. कारला व कुमठा गावांच्या पुनर्वसन करण्याच्या प्रस्तावाला तातडीने मान्यता देऊन आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी.

3.टेंभी येथील जवळपास २५० एक्कर जमीन महाजनको कंपनीने भेल प्रकल्पासाठी अधिग्रहित केली होती. नियोजित प्रकल्प रद्द झाल्यानंतरही सदरील जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्यात आलेली नाही. सध्या टेंभी एमआयडीसीकडे जमीन शिल्लक नसल्याने नवीन उद्योग उभारायला व एमआयडीसी विस्तार करायला अडचणी येत आहेत त्यामुळे महाजनकोकडील सदरील जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्यात यावी.

4.ऑक्टोबर २०२० मध्ये आलेल्या अतिवृष्टीत औसा मतदारसंघातील ९ पूल वाहून गेले आहेत तर अनेक रस्ते खराब झाले आहेत. औसा मतदारसंघासह लातूर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या/खराब झालेल्या रस्ते व पूल दुरुस्ती/उभारणीसाठी ४८ कोटी रुपयांचे प्रस्ताव लातूर जिल्हा परिषदने शासनाकडे सादर केले आहे. लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी सदरील प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा.

चर्चा झालेल्या सर्व विषयांना लातूरचे मा पालकमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिली असून लवकरच सर्व विषय मार्गी लागतील असा विश्वास आमदार अभिमन्यू पवार यांना आहे.

“परंपरा विश्वासाची”

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक – आनंद पाटील

मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.

संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !

📲7841913458

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय