खासदार सुनील मेंढे यांच्या ताफ्यातील वाहनाला ट्रकने दिलेल्या धडकेत वाहनाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने या अपघातात अन्य नुकसान झाले नाही.

खासदार सुनील मेंढे दिव्यांग साहित्य वाटप शिबिराला व जनता दरबाराला उपस्थित राहण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव कडे निघाले होते. वैनगंगा नदीवरील पुलाच्या दिशेने जात असताना महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती याच वाहतूक कोंडी दरम्यान दोन ट्रक चालकांचे भांडण झाले.

खासदारांच्या ताफ्यातील इनोव्हा गाडीच्या मागे असलेल्या ट्रक चालकाला दुसऱ्या ट्रकचालकाने गाडीखाली ओढले. यामुळे गेअर मध्ये असलेला ट्रक खासदारांच्या ताफ्यातील गाडीला घासत गेला. या अपघातात गाडीचे नुकसान झाले असून सुदैवाने गाडीत बसलेल्या सहकाऱ्यांना व वाहतूक कोंडीत अडकलेल्या इतर दुचाकी, चारचाकी वाहनांना तसेच नागरिकांना त्या अनियंत्रित ट्रक मुळे कोणतीही इजा झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय